एक्स्प्लोर

Bharat Gogawale: रामदास कदमांच्या वक्तव्यावर भरत गोगावलेंच्या विधानाने भुवया उंचावल्या; म्हणाले 'कोणाच्या मनात काय ते....',

Bharat Gogawale: रायगडच्या पालकमंत्री तिढा सोडवण्यात दिरंगाई होत आहे, यात कोणतंही दुमत नाही. पालकमंत्री पदाची माळ माझ्या गळ्यात कधी पडते, याची मी ही वाट पाहतोय, असंही ते म्हणालेत.

पुणे : दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेण्यात आले का? याची मला कल्पना नाही. असं म्हणत मंत्री भरत गोगावलेंनी (Bharat Gogawale) त्यांचे नेते रामदास कदमांची (Ramdas Kadam) पाठराखण करणं टाळलं आहे. कोणाच्या मनात काय आहे? हे कोणीचं सांगू शकत नाही. त्यांना कोणी असं बोलायला लावलं, असा ही कोणता प्रकार नाही. आता ते त्यावेळी  (Ramdas Kadam) तिथं होते, त्यांनी काही पाहिलं का? याचं ते उत्तर देतायेत. आम्ही यावर अधिकचं बोलणं उचित नाही, त्यामुळं पाहुयात आगे आगे होता है क्या? असं म्हणत गोगावलेंनी (Bharat Gogawale) या प्रकरणाचं गूढ वाढवलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी रायगडच्या पालकमंत्री तिढा सोडवण्यात दिरंगाई होत आहे, यात कोणतंही दुमत नाही. पालकमंत्री पदाची माळ माझ्या गळ्यात कधी पडते, याची मी ही वाट पाहतोय. असं म्हणत गोगावलेंनी आपल्याचं सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.(Bharat Gogawale)

Bharat Gogawale: नेमकं काय म्हणाले भरत गोगावले?

बाळासाहेबांचे ठसे घेतले याची आम्हाला कल्पना नाही. ते बोलले की मी तिथे सात-आठ दिवस होतो त्यामुळे त्यांना काही कळलं असेल ते त्यांना माहिती त्यावरती आम्ही काही बोलणं योग्य ठरणार नाही, रामदास कदम बोललेले आहेत, त्यावर काही लोक उत्तर देत आहेत पुढे काय होतं ते पाहूया, कोणाच्या मनात काय, कोणाच्या ध्यानात काय हे तुम्ही आम्ही कोणच काही सांगू शकत नाही.  त्यांना काय वाटलं ते काय बोलले त्याचे उत्तर तेच देत आहेत, असं म्हणत या विषयावर भरत गोगावले यांनी जास्त भाष्य करणं टाळल्याचं दिसून आलं.

Ramdas Kadam: रामदास कदमांचे बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतचं वक्तव्य 

रामदास कदम यांनी शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना म्हटले होते की, "माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे. शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता? याची माहिती काढा. मी खूप जबाबदारीनं मोठं विधान करत आहे. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आजही विचारून घ्या. दोन दिवस शिवसेना प्रमुखांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी का ठेवला होता? अंतर्गत काय चाललं होतं? मी ८ दिवस तिथे खाली मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो. सगळं कळत होतं. हे सगळं कशासाठी?" असं त्यांनी म्हटले.

तर दसरा मेळावा संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रामदास कदम यांनी मी मेळाव्यात जे बोललो ती माहिती मला बाळासाहेब ठाकरेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर ठेवला होता हे मला त्या डॉक्टरांनी सांगितलं, असे त्यांनी म्हटले. याचं कारण काय होतं? याबाबत विचारलं असता हे तुम्ही उद्धव ठाकरेंनाच विचारा. याबाबत मी कसं काय सांगणार? मातोश्रीवर ही चर्चा सुरु होती. बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहेत. मात्र ते कशासाठी घेण्यात आले ते काही समजलं नाही. आज मला बोलावंसं वाटलं म्हणून मी बोलले, असे रामदास कदम यांनी सांगितले.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठी रंगभूमीवर शोककळा! ‘वस्त्रहरण’चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन
मराठी रंगभूमीवर शोककळा! ‘वस्त्रहरण’चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन
Rakhi Sawant Warns Abhinav Kashyap: 'तू जिथे भेटशील टकल्या, चप्पलनं मारणार...'; राखी सावंतनं सलमान खानवर आरोप करणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाला झोड झोड झोडलं
'तू जिथे भेटशील टकल्या, चप्पलनं मारणार...'; राखी सावंतनं सलमान खानवर आरोप करणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाला झोड झोड झोडलं
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Share Market : शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Shocker: भाऊबीजेला लोकार्पण, गर्दीमुळे मोडतोड, 3 दिवसांत Pramod Mahajan उद्यान बंद!
Jalgaon Crime: 'पोलिसांचा धाक नाही', आमदार Eknath Khadse यांच्या घरात चोरीनंतर संताप
VSI Inquiry: 'चौकशीला काय घाबरताय?', Chandrashekhar Bawankule यांचा थेट सवाल
Rohit Pawar : 'दादांना प्रत्यक्षपणे टार्गेट करायचं का?', VSI च्या चौकशीवरून भाजपवर गंभीर आरोप
Farmers Protest: 'Ramgiri वर संध्याकाळी ५ नंतर धडकणार', Bachchu Kadu यांचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठी रंगभूमीवर शोककळा! ‘वस्त्रहरण’चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन
मराठी रंगभूमीवर शोककळा! ‘वस्त्रहरण’चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन
Rakhi Sawant Warns Abhinav Kashyap: 'तू जिथे भेटशील टकल्या, चप्पलनं मारणार...'; राखी सावंतनं सलमान खानवर आरोप करणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाला झोड झोड झोडलं
'तू जिथे भेटशील टकल्या, चप्पलनं मारणार...'; राखी सावंतनं सलमान खानवर आरोप करणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाला झोड झोड झोडलं
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Share Market : शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
Nilesh Sable In Vahinisaheb Superstar Show: डॉ. निलेश साबळे नव्या अंदाजात, नव्या रुपात;  महाराष्ट्रातल्या वहिनींसाठी घेऊन येतायत नवाकोरा शो, नाव माहितीय?
डॉ. निलेश साबळे नव्या अंदाजात, नव्या रुपात; महाराष्ट्रातल्या वहिनींसाठी घेऊन येतायत नवाकोरा शो, नाव माहितीय?
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
Bollywood Actor Struggle Life Story: वडील 'सुपरस्टार', 500 फिल्म्स केल्या, पण मुलगा ठरला 'सुपरफ्लॉप'; चार फिल्म्सनंतरच इंडस्ट्रीला म्हणाला टाटा-बाय बाय...
वडील 'सुपरस्टार', 500 फिल्म्स केल्या, पण मुलगा ठरला 'सुपरफ्लॉप'; चार फिल्म्सनंतरच इंडस्ट्रीला म्हणाला टाटा-बाय बाय...
IND-W vs AUS-W : टीम इंडियाला मोठा दिलासा, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी, ICC कडून मंजुरी 
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात आक्रमक शफाली वर्माची एंट्री, दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी संधी
Embed widget