मंचर, पुणे : विरोधक महागद्दार आहेत हे माहिती होत पण विरोध  करण्याचा पोरकट बालिशपणा करत भेकडपणा करतील हे माहिती नव्हतं, विरोधक महागद्दार आहेत हे माहिती होत पण विरोध  करण्याचा पोरकट बालिशपणा करत भेकडपणा करतील हे माहिती नव्हतं, अशा शब्दात शिरुर लोकसभा (Shirur Loksabha Constituency) मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी विरोधकांवर टीका केली आहे. अशा शब्दात शिरुर लोकसभा (Shirur Loksabha Constituency) मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी विरोधकांवर टीका केली आहे. अमोल कोल्हेंंचा सध्या प्रचार जोमात सुरु आहे. मंचरमध्ये प्रचार करताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 


यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, ज्या मंचर शहराला स्वर्गीय किसनराव बाणखेले यांच्या विचारांचा वारसा आहे, त्या शहरात विरोध करण्याचा पोरकट बालिशपणा करण्यात आला. त्यावरुन हे गद्दार आहेत हे माहिती होत हे इतके भेकड आहेत हे माहीत नव्हतं. स्टेज तुम्ही निवडा आणि समोरासमोर येऊन चर्चा करा आणि एकदा होऊनच जाऊ द्या, असं थेट जाहीर आव्हान विरोधकांना दिलं.कोविड काळात खासदार कुठं होते असं विचारणाऱ्या विरोधकांच खरचं हसू येत, असं सांगत अमोल कोल्हे म्हणाले की, शिरूर तालुक्यातील पाच लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करून घेणारा अमोल कोल्हे हा देशातील पहिला खासदार होता. इतकंच नव्हे तर फॅबी फ्ल्यु या 105 रुपयांच्या गोळीची किंमत चाळीस रुपयांनी कमी करणाराही खासदार अमोल कोल्हेच होता, असंही त्यांनी खज्या शब्दांत सांगितलं. 


कोल्हे यांच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्त्युत्तर देताना डॉ. कोल्हे म्हणाले की, घोषणा जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने दिल्या जात असतील, तर मग उमेदवारांनी याच उत्तर द्यावं, त्या पंतप्रधानांच्या हाताखाली काम करणाऱ्या सरकारने आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर निर्यात बंदी लादली होती, तेव्हा तुमचं तोंड का शिवल होत, जेव्हा दुधाचे भाव दहा ते बारा रुपयांनी पडले तेव्हा तुमचं तोंड का शिवलं होतं? बिबटप्रवण क्षेत्रात दिवसा थ्री फ्रेज लाईट का दिली जात नाही हे विचारताना तुमचं तोंड का शिवलं होतं?, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. 


मी वैयक्तिक टिकेवर गेलो नाही, याचा अर्थ माझ्याकडे पुरावे नाहीत असा नाही


 उमेदवारी मिळाल्यावर वैयक्तिक टीका करायची नाही असं ठरवलं होतं.  पण राजकीय सुसंस्कृतपण अपेक्षित असताना, मी कोणत्याही परिस्थितीत पातळी सोडायची नाही, असं ठरवलं होतं. आणि अजूनही ते कसोशीने जपलं आहे. पण अश्या पद्धतीने जर पोरकटपणा दाखवत असाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा कधीच विजय होत नाही. पुरावे माझ्याकडे ही आहेत, असंही अमोल कोल्हे म्हणाले. 


इतर महत्वाची बातमी-


Lok Sabha Election: पवार कुटुंबियांतील निकटवर्तीयाच्या हाती ठाकरेंची मशाल; श्रीरंग बारणेंचा पराभव निश्चित, संजोग वाघेरेंचा विश्वास