पुणे मावळ लोकसभेत (Maval Loksabha)  आज महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere)  अर्ज दाखल करणार आहेत. ठाकरेंची मशाल हाती घेऊन ते पहिल्यांदाच ते नशीब आजमावणार आहेत. काल अर्ज दाखल केलेले आणि सलग दोनवेळा खासदार झालेले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंशी (Shrirang Barane) त्यांची लढत होणार आहे. तसंच लढत सोपी नसली तरी अवघड नक्कीच नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 


मावळ लोकसभेत आज महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे अर्ज दाखल करणार आहेत.  काल अर्ज दाखल केलेले आणि सलग दोनवेळा खासदार झालेले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंशी ते दोन हात करणार आहेत. लढत सोपी नसली तरी अवघड नक्कीच नाही, असा विश्वास ते अर्ज दाखल करताना व्यक्त करतायेत. शिवसेनेचे आदित्य ठाकरे, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचेअमोल कोल्हे, रोहित पवार आणि शेकापचे  बाळाराम पाटील रॅलीत सहभागी असतील. सभेला संबोधित ही करणार आहे.


विरोधात उमेदवार तगडा मात्र आमचा विजय निश्चित : संजोग वाघेरे


निवडणुकीविषयी बोलताना संजोग वाघेरे म्हणाले,  कोणतीही निवडणूक ही महत्त्वाची असते. आपल्या विरोधात असलेला उमेदवार तगडा आहे. त्यामुळे आम्ही देखील तशीच तयारी केली आहे. ज्या पद्धीतने रॅलीला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे त्यावरुन मतदारराजाचा कौल आम्हाला मिळणार असून आमचा विजय निश्चित आहे.  गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. खोट्या आश्वासनांना, महागाईला जनता वैतागली असून आम्हाला मते मिळणार हे निश्चित आहे. 


आदित्य ठाकरेंची आज पिंपरीत सभा 


संजोग वाघेरे यांच्या प्राचारार्थ आयोजित केलेल्या रॅलीत  आदित्य ठाकरे, रोहित पवार सहभागी होणार आहे.  मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा निवडणूक अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे दुपारी पिंपरी चिंचवड येथे पोहोतील.  त्यानंतर जाहीर सभेचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.


 मावळ मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट 


महायुतीकडून श्रीरंग बारणे (Shrirang barne) यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून उबाठाच्या संजोग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार आहे. प्रचारादरम्यान मतदार संघात रंगत बघायला मिळते आहे.  


हे ही वाचा :


VBA Loksabha Candidate List : मावळ आणि शिरुरची लढत ठरली, मुस्लीम उमेदवारही रिंगणात, वंचितची सातवी यादी जाहीर