पुणे : शिवाजी आढळरावांनी सरड्या पेक्षा पटकन रंग बदलला. त्यांच्या या भूमिकेने सगळे सरडे संपावर गेले असावेत, अशी तिरकस टीका अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) केली. कोल्हे मला आव्हान-प्रतिआव्हानामध्ये गुंतवून ठेवण्याचा डाव करतायेत. त्यामुळं यापुढं मी कोल्हेना प्रतिउत्तर देणार नाही. आढळरावांनी ही भूमिका घेतल्यानंतर कोल्हेंनी त्यांना सरड्याची उपमा दिली.


शिरूर लोकसभेतील कोल्हे-आढळरावांमधील आव्हान-प्रतिआव्हानाच्या नाट्याने असा नवा रंग घेतला आहे. सुरुवातीला आढळरावांनी कोल्हेना आव्हान दिलं, मग कोल्हेंनी आढळरावांना प्रतिआव्हान दिलं. पुरावे द्या अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडा, यावरून दोघांमध्ये खडाजंगी सुरू आहे. यात आढळरावांचे आव्हान कोल्हेंनी स्वीकारले पण कोल्हेचे प्रतिआव्हान स्वीकारण्यापूर्वी आढळरावांनी मी यापुढं प्रतिउत्तर देणार नाही. कोल्हे मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवण्याचा डाव करतायेत, असा आरोप आढळरावांनी केला. आढळरावांची ही भूमिका म्हणजे सरड्या पेक्षा जलद रंग बदलणारी आहे, अशी तिरकस टीका कोल्हेंनी केली. आता मौन बाळगण्याची भूमिका घेणारे आढळराव या टीकेला प्रतिउत्तर देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


 अमोल कोल्हेंनी थेट पुरावे दाखवले अन्...


शिरूर लोकसभेतून शिवाजी आढळराव आता माघार घेणार का? असा प्रश्न अमोल कोल्हेनी विचारला आहे. आढळरावांनी पुरावे सादर करण्याचं दिलेलं आव्हान कोल्हेनी पूर्ण केलंय. लोकसभेत 7 एप्रिल 2017 आणि 13 फेब्रुवारी 2019 रोजी मांडलेल्या प्रश्नांची कागदपत्रे कोल्हेनी दाखवली आहेत. आढळरावांनी त्यांच्या कंपनीचं हित जोपासण्यासाठी लोकसभेत हा खटाटोप का केला? याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यावं. शिवाय मी पुरावे दिल्यावर लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडणार, हा दिलेला शब्द आता आढळरावांनी पूर्ण करावा, असं प्रतिआव्हान कोल्हेनी दिलंय. मुळात हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असं म्हणत 17 मार्च 2017, 9 डिसेंबर 2016 आणि 26 डिसेंबर 2018 या तारखांना कंपनी हितासाठी मांडलेल्या प्रश्नांची आठवण करून दिली. सोबत कागदपत्रांचा गठ्ठा दाखवत हे सगळे पुरावे टप्याटप्याने जनतेसमोर मांडणार असल्याचा इशारा देत, कोल्हेनी आढळरावांचं टेन्शन वाढवलं आहे. आता आढळराव हे प्रतिआव्हान स्वीकारणार का? लोकसभेच्या रिंगणातून माघार घेण्याचं शब्द पाळणार का? की आढळराव हे पुरावे खोडून कोल्हेंना निवडणुकीतून बाहेर पडण्याचं नवं आव्हान देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


इतर महत्वाची बातमी-


Shrinivas Pawar: घराण्यातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई बहिणीकडे राहायला गेली, अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील: श्रीनिवास पवार


Sharad Pawar : तेच शरद पवार, तेच बारामती, पण चिन्ह अन् मैदान मात्र वेगळं असणार; अजित पवारांनी हक्काचे मैदान घेतले!