Ajit Pawar Speech : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी कमळ (Lotus) चिन्ह (Symbol) घेतलं असतं तर आपला सुपडासाफ झाला असता, असं वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. 2014 ला महादेव जानकर कमळावर लढले असते तर आपला सुपडासाफ झाला असता. 2014 साली आपण थोडक्यात वाचलो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. महादेव जानकर कमळावर लढले असते, तर 2014 ला सुप्रिया सुळे (Supriya Sule) पराभूत झाल्या असत्या, असं अजित पवारांनी सांगितलं आहे. 


...तर सुप्रिया सुळेंचा पराभव झाला असता


2014 च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकरांनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर आपला सुपडासाफ झाला असता असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सुप्रिया सुळेंविरोधात जवळपास 70 हजार मतांनी जानकरांचा पराभव झाला होता. पण ती निवडणूक जानकर कमळ या चिन्हावर लढले नव्हते.  जर जानकर कमळ चिन्हावर लढले असते तर सुप्रिया सुळेंचा पराभव झाला असता असं अजित पवार म्हणालेत


जानकरांनी हाती कमळ घेतलं असतं, तर...


मागच्या वेळेस थोडक्यात वाचलो आपण. खडकवासलाच्या लोकांनी सांगितलं दादा महादेव जानकरांनी जर त्या निवडणुकीत कमळ घेतलं असतं, तर आपला सुपडा साफ झाला असता. कारण खडकवासला मधल्या मतदारांना कपबशी हे जानकरांचं चिन्ह आहे, हे माहित नव्हतं, ते कमळाला मत देऊन आले. आता पंतप्रधानांनीही जानकरांचं खूप कौतुक केलं आहे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.