मावळ, पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मावळ लोकसभेचे शिवसेनेचे (?Maval Loksabha Constituency) उमेदवार संज्योग वाघेरे (Sanjyog waghere) यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांनी महायुतीवर तुफान फटकेबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासातील उदाहरण देत त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला. औरंगजेब जेव्हा आदिल शहांच्या सांगण्यावरुन मावळावर चढून आले होते. तेव्हा कान्होजी जेधेंनी काय केलं हे आपल्याला माहित आहे. मी आदिल शहा म्हणतोय तुम्हाला सध्या शहाच ऐकू येत असेल, असं म्हणत अमोल कोल्हेंनी नाव न घेता अमित शहांवर निशाणा साधला. यावेळी सभेत हशा पिकला होता.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संज्योग वाघेरे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीने मावळ लोकसभा मतदारसंघात मोठं शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नेते अदित्य ठाकरे, माणिकराव ठाकरे, संज्योग वाघेरे उपस्थित होते. मावळच्या शिवाजी महाराजांच्या भूमिवर अमोल कोल्हे यांनी इतिहासाचे दाखले देत मावळकरांना मतदानाचं आणि योग्य लोकप्रतिनिधी निवडून देण्याचं आवाहन केलं. रावण राजा होता, प्रचंड शक्तिशाली होता. पण याच रावणाने हनुमानाची शेपटी पेटवली. तेंव्हा ही शेपटी हनुमानाने मशाल समजली. आजच्या हनुमान जयंती निमित्त अशीच मशाल तुम्ही पेटवा, असं ते म्हणाले.
अमोल कोल्हे पुढे बोलताना म्हणाले की, तुम्ही म्हणाल हा शिरुरला उमेदवार आहे. तरी मावळच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे. मात्र एक सांगतो. ज्याचा बालेकिल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि किल्ला मजबूत असेल तर मुलुखगिरीला जाता येतं. शिरुरचा किल्ला शिरुरच्या मावळांच्या खांद्यावर सुरक्षित असल्याने मी संज्योग वाघेरेंचा अर्ज भरण्यासाठी आलो.
यासोबतच अजित पवारांवरदेखील त्यांनी निशाणा साधला आहे. अजित पवार एक सभेत बोलताना म्हणाले होते. कि आता आचारी आणि वाढपी मीच आहे. त्यामुळे काळजी करु नका, सगळं मिळेल. याचाल उत्तर देताना पिंपरी चिंचवडमध्ये विकास करताना आचारी कोण आणि वाडपी कोण होते? याचा विचार करा, असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
इतर महत्वाची बातमी-