पुणे : डी.एस.के यांच्या (DSK) एका घोटाळ्यातून दुसरा घोटाळा करण्याचा प्रयत्न होत असताना डीएसके यांच्या ठेवीदारांना मात्र वाली उरलेला नाही. गेल्या सहा-सात वर्षांमध्ये डीएसके यांचे एफडी होल्डर, त्यांच्याकडे फ्लॅट बुक केलेले त्यांचे ग्राहक किंवा डीएसके कडे पैसे गुंतवलेले लोक त्यांच्या हाताला काहीही लागलेलं नाही. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये संताप आणि निराशा पाहायला मिळत आहे. त्यातच बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींनी हजारो कोटी रुपयांच्या मालमत्ता असलेली त्यांची कंपनी पुण्यातील चार बांधकाम व्यावसायिकांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आपण आपल्या ठेवीदारांची देणी देऊ शकत नाही, असं डी एस केंचं म्हणणं आहे. मात्र डी एस केंनी तपास यंत्रणांची कारवाई होण्याच्या आधीच डी एस केंनी ठेवीदारिंची देणी परत का केली नाहीत? असा प्रश्न विचारलाय.
डी. एस. केंच्या मालमत्ता ताब्यात घेण्यात हा कायदेशीर मार्गाने केलेला आणखी एक घोटाळा असल्याचं या गुंतवणूकदारांनी म्हटलंय आणि सरकारने यामधे लक्ष घालाव अशी मागणी केली आहे. इतकी वर्ष पैसे परत न मिळाल्याने डी एस केंच्या अनेक गुंतवणूकदारांचा हलाखीत मृत्यु झालाय तर कित्येकांना पैसे भरुनही मागील दहा वर्षांत हक्काचे घर मिळालेले नाही. आणि दुसरीकडे बँकांचा कर्जाचा बोजा अंगावर असल्याने नवीन कर्ज देण्यासही बँका तयार नाहीत अशा परिस्थितीत या ठेवीदारांना त्यांची परिस्थिती विषद करताना अश्रु अनावर झाले.
2015 साली कर्ज घेऊन फ्लॅट बुक केला होता. मात्र ती जागाच डीएसकेंची नसल्याचं नंतर लक्षात आलं. त्यात कर्ज घेऊन फ्लॅट बुक केल्यानं पुन्हा आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे.डीएसकेंकडे कडे केलेल्या गुंतवणुकीमुळे आणि त्यात झालेल्या फसवणुकीमुळे तरुण मुलाच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि सिबील स्कोर खराब झाल्याने पुन्हा कर्ज मिळणं शक्य होत नाही, असं गुंतवणूकदार शीला खानोलकर, रुपाली आंबेकर, ओंकार माणगावकर, अरविंद खानोलकर, संजय अश्रित यांनी सांगिलतं आहे. डीएसकेंच्या सगळ्या घोटाळ्यात बॅंकेचे अधिकारीदेखील सहभागी असल्याचा आरोप खानोलकरांनी केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र बॅंकेच्या चार अधिकाऱ्यांना अटकदेखील केली होती.
उठता लात, बसता बुक्की, अशी परिस्थिती
आयुष्याची सगळीच घरासाठी गुंतवली मात्र घर हाती मिळालंच नाही. त्यात मुलांच्या शिक्षणाचादेखील प्रश्न निर्माण होत आहे. शिक्षणासाठी किंवा दुसरं घर घेण्यासाठीदेखील कर्ज मिळत नाही आहे. त्यामुळे उठता लात, बसता बुक्की, असी परिस्थिती ओढावल्याचं त्रस्त ठेवीदारांनी सांगितलं आहे.
इतर महत्वाची बातमी-