पुणे : पुणे जिल्ह्यात बिबट्याचं प्रमाण चांगलंच वाढलं आहे. त्यातच बिबट्यांच्या  हल्ल्याच्या घटनादेखील वाढल्या आहेत. संपत मोरे या शेतकऱ्याच्या शेतात वास्तव्याला असणाऱ्या धनगराच्या चिमुकल्या दीड वर्षाच्या मुलीवर पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्याच चिमुकलीचा जीव गेला आहे. जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द गावातील ही घटना आहे. 


नेमकं काय घडलं?


संस्कृती संजय कोळेकर (मूळ रा. धोत्रे, टाकळी ढोकेश्वर, जि. नगर) असे या मुलीचे नाव आहे.संजय कोळेकर यांनी त्यांच्या शेतात संपत मोरे राहत होते. शेतीची देखभाल करायचे. साधारण सगळेच साखर झोपेत असताना साधारण पाचच्या सुमरासा बिबट्या आला आणि त्याने थेट चिमुकलीला तोंडात धरुन उचलून नेले. यासंदर्भात माहिती मिळताच वनविभागाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर चिमुकलीचा शोध सुरु झाला. चिमुकलीचा शोधाशोध सुरु असताना साधारण अर्ध्या किलोमीटर दूर या चिमुकलीचे अवशेष सापडले. हे पाहून वनविभागाच्या रेस्कू टीमला धक्काच बसला. ही घटना फार दुर्दैवी आणि आपण सगळ्यांनी आपलं संरक्षण करणं गरजेचं आहे, या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाणार आहे आणि बिबट्यांचा हल्ला रोखण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं  सहायक वनसंरक्षक अमित भिसे यांनी सांगितलं. 


बिबट्यांचे हल्ले वाढले!



पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर आणि हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीआंबेगाव तालुक्यातील थोरांदळे फुटाणे मळा येथे धनगर समाजाच्या सात महिन्याच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेत मुलाच्या आईने बिबट्यास जोरदार प्रतिकार करत आपल्या मुलाचं प्राण वाचवलं होतं. आंबेगाव येथील फुटाणे मळा येथे सुखदेव फुटाणे यांच्या शेतात धोंडीभाऊ करगळ या मेंढपाळाचा वाडा बसलेला होता. मेंढपाळ धोंडीभाऊ करगळ यांची पत्नी सोनल करगळ ही तिच्या सात महिन्याचा मुलगा देवा याला घेऊन वाड्याच्या शेजारीच बाहेर झोपली होती. रात्री दोन वाजता सुमारास ती झोपली असताना मुलाचा हात अंथरुणाबाहेर पडला होता. त्यावेळी बाजूलाच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला होता. मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत शिरत असावेत असा अंदाज आहे. मात्र या बिबट्यांच्या अशा वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.


इतर महत्वाची बातमी-


Karan Pawar: भाजप का सोडली? महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी सांगितले कारण, म्हणाले भाजपात सत्य वेगळं...