Vijay Shivtare : बारामती लोकसभेसाठी घेतलेला निर्णय आणि मांडलेली माझी लॉजिक ठीक होती. परंतु आता ते जाऊ द्या, लोकांना प्रचंड उत्साह होता, पुरंदरमध्ये तर जादू झाली असती. मतदारसंघातून आणि महाराष्ट्रातून अनेक नेते आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे म्हणाले. सासवडमध्ये झालेल्या महायुतीच्या जनसंवाद मेळाव्यात विजय शिवतारे काय बोलणार? याकडे लक्ष होते. यावेळी बारामतीमधून का माघार घेतली यावर शिवतारे यांनी खुलासा केला. 


दादा मुख्यमंत्र्यांशी बोलत होते


विजय शिवतारे म्हणाले, माघारीसाठी दोनदा मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा झाली. परंतु, माझं मन तयार होत नव्हतं. देवेंद्र फडणवीस साहेब दोन-तीन वेळा बोलले. दादा मुख्यमंत्र्यांशी बोलत होते. मी निश्चय केला होता की कोणत्याही परिस्थितीत लढायचं म्हणजे लढायचं आणि लोकांच्या हातात निवडणूक असेल, लोकांना ठरवू द्या.  



म्हणून निर्णय बदलला 


ते पुढे म्हणाले की, सुनेत्रा ताई उमेदवार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून प्रत्येक मत देणार आहेत. देशाची तिसऱ्यांदा सत्ता त्यांच्या हातात येणार आहे. गोरगरीब लोकांसाठी काम करणारा माणूस असल्याने असं वागलं तर बरोबर नाही म्हणून निर्णय बदलला. मुख्यमंत्री महोदय पुन्हा एकदा सांगतो आयुष्यात कसलेही भीती मला नाही.  आपले सांगणे, देवेंद्रभाऊंचं सांगणे आणि त्याचबरोबर मी देखील विचार केला. 


किती खोके घेतले, दादांसमोर फाटली काय असे म्हणत होते


शिवतारे यांनी सांगितले की, तथापि, माझ्या विचाराने किती खोके घेतले, दादांसमोर फाटली काय असे म्हणत होते. मात्र, विजय बापू शिवतारेंना कोणत्याही आणि कोणाच्याही खोक्यांची गरज नाही. देवाने जेवढे खोके दिलेत मला मला गरज नाही. परंतु तो गैरसमज आपलाही होऊ नये. ज्या पद्धतीने संपूर्ण लोक पेटून उठले होते सर्व पक्षाचे होते. पुरंदर, हवेलीच्या आणि संपूर्ण मतदारसंघातील जनतेने तो एवढा पाठिंबा मला दिला होता, इतका उत्साह होता. 


ते म्हणाले की, प्रचंड राग त्यावेळी आला होता. कधी कधी बोलता बोलता अनेकांच्या चुका होतात, पण प्रचंड रोष दादा पुरंदरच्या जनतेचा होता. जेव्हा जेव्हा मी गावात जायचो सर्व बसलेले लोक मला म्हणायला लागले बापू आम्ही ऐकणार नाही. नरेंद्र मोदींना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान बनवण्यासाठी दादा असतील, भाई असतील सर्वजण आम्ही सर्व एवढ्याच कारणासाठी त्यांच्याबरोबर आहोत. एक अतिशय निस्वार्थी त्यागी 18 तास लोकांसाठी काम करणारा वर्षानुवर्ष सुट्टी न घेतलेलं त्यागी असं व्यक्तिमत्व हे भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजे, यासाठी माघार घेतल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या