एक्स्प्लोर

Sharad Pawar: पुण्यातील कार्यक्रमात शेजारी न बसण्याचं पवार काका-पुतण्यांनी दिलं सारखंच उत्तर; म्हणाले 'सहकारमंत्र्यांना...'

Sharad Pawar On Ajit Pawar: अजित पवार यांनी शरद पवार यांच्या शेजारी बसण्याचे टाळले. यावर आज पत्रकार परिषदेत शरद पवारांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं आहे.

पुणे: पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची (व्हीएसआय) काल (गुरूवारी, 23)  वार्षिक सर्वसाधारण सभा आणि त्याचेवळी चांगली कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar) , जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य मान्यवर एकाच व्यासपिठावर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची आसन व्यवस्था शेजारी-शेजारी करण्यात आली होती. मात्र, सभा सुरू होण्यापूर्वी अगोदर अजित पवार हे व्यासपीठावर आले आणि त्यांच्या शेजारी-शेजारी बैठक व्यवस्था आणि नावाची पाटील असल्याचे लक्षात येताच त्यांनी ती व्यवस्था बदलली. त्यामुळे अजित पवार यांनी शरद पवार यांच्या शेजारी बसण्याचे टाळले. यावर आज पत्रकार परिषदेत शरद पवारांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले शरद पवार

आज कोल्हापुरात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी शेजारी बसणं टाळलं का? यावर बोलताना शरद पवार म्हणाले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विनंती केली दोन तीन गोष्टी तुमच्या कानावर घालायच्या आहेत, त्यामुळे ते माझ्या शेजारी बसले.  नवीन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत त्यांना माझ्याशी बोलायचं होत मीच म्हटलं मग माझ्या बाजूला बसा, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. 

नेमकं काय घडलं?

सभा सुरू होण्यापूर्वी अगोदर अजित पवार हे व्यासपीठावर आले आणि त्यांच्या शेजारी-शेजारी बैठक व्यवस्था आणि नावाची पाटील असल्याचे लक्षात येताच त्यांनी ती व्यवस्था बदलली. त्याचबरोबर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे भाषणासाठी उभे राहिल्यानंतर त्यांच्या खुर्चीवर अजित पवार यांच्या नावाचा फलक दिसला. ही बाब अजित पवार यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी त्यांनी संस्थेचे महासंचालक संभाजी कडू पाटील यांना काही बोलण्यासाठी बोलून घेतले आणि तो फलकही त्यांनी स्वतःच्या हाताने खुर्चीच्या मागे ठेवल्याचं दिसून आलं. 

अजित पवारांनी का शेजारी बसलो नाही त्यावर दिलं उत्तर

सभेनंतर अजित पवार यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्या वेळी शेजारी-शेजारी बसणे टाळल्याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे पहिल्यांदाच सहकारमंत्री झाले असून, त्यांना शरद पवार यांच्याशी बोलायचे होते. म्हणून त्यांना शेजारची खुर्ची दिली. माझा आवाज हा दोन तीन खुर्चा ओलांडून दूर जाऊ शकतो. म्हणून मी दूर बसलो. व्हीएसआयच्या गेल्या दोन वर्षांतील बैठकांना येण्याचं त्यांनी टाळलं का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, तेव्हा मी फार कामात होतो. माझे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील याचा विचार करत होतो, असे त्यांनी मिश्किलपणे म्हटलं आणि एकच हशा पिकला. 

शरद पवार यांच्या केबिनमध्येही नेत्यांची चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी लवकर व्हीएसआयमध्ये आले होते. ते थेट संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या केबिनमध्ये गेले. सुमारे अर्धा तास ते केबिनमध्येच होते. या वेळी त्यांच्या गटाचे नेते आमदार दिलीप वळसे पाटीलही यावेळी उपस्थित होते. त्यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली, याबद्दल पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, साखर उद्योग, इथेनॉल, साखर कारखानदारीचे प्रश्न यांच्यासह राज्य सरकारशी संबंधित ऊर्जा, कृषी, उत्पादन शुल्क आणि सहकार या खात्याशी संबंधित प्रश्न सोडविण्यावर चर्चा झाली. तसेच व्हीएसआय संस्थेची विस्तार वाढ, नवे प्रकल्पांवर चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget