Sharad Mohol Wife : शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर (Munna Polekar) याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर मुन्ना पोळेकरच्या नावाने अकाऊंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्वाती मोहोळ यांना मेसेज करुन आणि आक्षेपार्ह पोस्ट करत हा प्रकार केलाय. 


मुन्ना पोळेकरच्या नावानेच धमक्या 


मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्या नावानेच या धमक्या देण्यात येत आहेत. पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरु आहे. काही दिवसापूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडत करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरुच आहेत. शरद मोहोळची पत्नी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर आली होती. माझ्या पतीच्या जाण्याने मी खचणार नाही, असेही तिने स्पष्ट केले होते. 


गणेश मारणे याच्यापासून जीवाला धोका, स्वाती मोहोळ यांचा दावा 


शरद मोहोळची (Sharad Mohol) पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी न्यायालयात याबाबतची माहिती दिली होती. दरम्यान आता अजून एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा स्वाती मोहोळने केलाय. 


कधी झाली होती शरद मोहोळची हत्या 


 शरद मोहोळ याची 5 जानेवारी रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवशी त्याच्या आयुष्याची दोरी कापली गेली होती.शरद मोहोळ जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे त्याचे साथीदार बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत चालायला लागले.  सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडलेला शरद मोहोळ काही पावले चालला असेल तोच याच साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. तिघांनी त्यांच्याजवळील पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या,  एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागली. काही कळायच्या आत पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात गेली दीड दशके दहशत असलेला शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला.  



इतर महत्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray : ते जय श्रीराम म्हणतात, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतो; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका