Chiplun : भारतीय जनता पक्षाने (BJP) 2014 मध्ये माझा पक्षप्रमुख म्हणून पाठिंबा घेतला. माझ्या सह्या घेतल्या. माझा पाठिंबा घेताना यांना मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) मुलगा आहे हे माहिती नव्हते का? तेव्हा घराणेशाहीबाबत हे बोलले नाहीत. हे त्यांचे ढोंग आणि हरामखोरपणा आहे. ते जयश्री राम म्हणतात मी त्यांना हरामखोरपणा म्हणतो, अशी जहरी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. चिपळून येथे ठाकरे गटाची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत होते.
जनतेकडून न्याय मिळेल : उद्धव ठाकरे
आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, देशातील सर्वांत महत्वाचे सर्वांत महत्वाचे न्यायालय जनता न्यायालय आहे. आम्ही पाप केलेले नाही. त्यामुळे जनतेत आम्ही जाऊ शकतो. आज ही गर्दी बघा. मी एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमांना खुर्च्या रिकाम्या असतात.
2014 मध्ये माझ्याकडे पाठिंबा घेण्यासाठी कशाला आला होतात?
बाळासाहेबांचे विचार मी सोडलेले नाहीत. हे सांगण्यासाठी मी भाजपला कमळाबाई म्हणतो. भाजपला वाटत होते की, शिवसेना संपेल.2014 सालीच हे शिवसेना संपवायला निघाले होते. 2014 साली मीच पक्षप्रमुख होतो. भाजप सध्या म्हणतोय हे पक्षप्रमुख नाही. तर 2014 मध्ये माझ्याकडे पाठिंबा घेण्यासाठी कशाला आला होतात? तेव्हाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे आम्ही गेलो होतो.आमच्या महायुतीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड करा, असे म्हणालो होतो. त्यासाठी माझ्या सह्या घेतल्या होत्या. कशासाठी माझ्याकडे पाठिंबा घेण्यासाठी आला होतात? असा सवालही ठाकरेंनी केलाय.
'स्वत:च्या घराचा पत्ता नसलेलो लोक आमच्या घराणेशाहीबाबत बोलतात'
घराणेशाहीबाबत बोलणारा माणून घरंदाज असायला हवा. त्याचे घरदार, कुटुंब सांभाळून तो घराणेशाहीबाबत बोलला तर मी समजू शकतो. स्वत:च्या घराचा पत्ता नसलेलो लोक आमच्या घराणेशाहीबाबत बोलतात. 2014 आणि 2019 ला माझा पाठिंबा घेताना यांना मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे हे माहिती नव्हते का? तेव्हा घराणेशाहीबाबत हे बोलले नाहीत. मी म्हणतो मोदी यांचा शिवप्रेम हे बेगडी आहे. आधी कोकणात आले पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेला, अशी टीकाही त्यांनी केली.
(उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण) Uddhav Thackeray Full Speech
इतर महत्वाच्या बातम्या