एक्स्प्लोर

Daund Murder case: मध्यरात्री गस्त घालताना सुरक्षा रक्षकाची हत्या; दौंडमधील धक्कादायक घटना

दौंडमधील बीएसएनएल ऑफिसमध्ये सुरक्षकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना आज मध्यरात्री घडली. प्रकाश सुखेजा असं 60 वर्षीय खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

Daund Murder case:  दौंडमधील बीएसएनएल ऑफिसमध्ये सुरक्षकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना आज मध्यरात्री घडली. प्रकाश सुखेजा असं 60 वर्षीय खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. दौंड शहरातील बीएसएनएलच्या ऑफिसमध्ये प्रकाश सुखेजा मध्यरात्री हे गस्त घालत होते. त्यावेळी मध्यरात्री 2 च्या दरम्यान काही अज्ञात इसम त्यांना बीएसएनएलच्या ऑफिसमधून बाहेर पडताना दिसले. 

सुखेजा हे चोरट्यांच्या जवळ गेले असता त्यांच्या हातात ऑफिस मधून चोरलेल्या तांब्याच्या तारा होत्या. तांब्याच्या तारा चोरून नेणाऱ्या चोरट्यांना प्रकाश सुखेजानी विरोध केला तेव्हा सुखेजा आणि चोरट्यांच्यात झटापट झाली. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केले त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात चोरट्यांविरोधात सुखेजा यांच्या मुलाने मनोज सुखेजाने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून दौंड पोलीसानी गुन्हा दाखल केला आहे.  गुन्ह्याचा अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.

घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दौंडमधील बीएसएनएल ऑफिसमध्ये सुरक्षकाचा  खून झाल्याने ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना धास्ती बसली आहे. या सगळ्या प्रकरणात निष्पाप सुरक्षकाचा  बळी गेल्याची भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे सुरक्षारक्षकांना रात्रीचा गस्त घालण्यास भीती वाटण्याती शिक्यता आहे.

यापुर्वी लोणी काळभोर परिसरातून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. थेऊर परिसरातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आवारात सापडलेल्या तरुणीच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले होतं. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या तपासात तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले होते. वैशाली लाडप्पा दुधवाले असे मृत महिलेचे नाव असून ती मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातील होती. सध्या ती भीमा कोरेगाव येथे राहत होती. तिचा प्रियकर महेश पंडित चौघुले याला पोलिसांनी अटक करण्यात आली होती. वैशाली केअर टेकर म्हणून काम करत होती. दोघेही एकाच गावातील होते. पाच महिन्यांपूर्वी ते प्रेमात पडले होते.  

 

 

 

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Amol Palekar On Vidyanand Bapat: 'एका व्यक्तीचा आवाज कदाचित कुजबुज वाटेल, पण...'; अमोल पालेकरांचं विद्यानंद बापटांवरचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
'एका व्यक्तीचा आवाज कदाचित कुजबुज वाटेल, पण...'; अमोल पालेकरांचं विद्यानंद बापटांवरचं वक्तव्य चर्चेत
Pune Crime News: जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकरला अटक; पुणे पालिकेत नोकरीचं आमिष; पावणेतीन कोटींचा गंडा, बनावट शिक्के, सह्या, बोगस जॉईनिंग लेटर अन् पगारही दिला
जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकरला अटक; पुणे पालिकेत नोकरीचं आमिष; पावणेतीन कोटींचा गंडा, बनावट शिक्के, सह्या, बोगस जॉईनिंग लेटर अन् पगारही दिला
Ketan Agrawal Case : ‘माही’च्या फोटोचा गैरवापर करून केतनला लोहगडावर बोलावलं; 'त्या' मैत्रिणीलाही सिया-चेतनकडून धमकी, केतनला फोन करण्यासाठी घातली गळ, मैत्रिणीनं पोलिसांना सगळं सांगितलं
‘माही’च्या फोटोचा गैरवापर करून केतनला लोहगडावर बोलावलं; 'त्या' मैत्रिणीलाही सिया-चेतनकडून धमकी, केतनला फोन करण्यासाठी घातली गळ, मैत्रिणीनं पोलिसांना सगळं सांगितलं
Climate Week India 2026: हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन
हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asian Games 2026 : आईनं सोनं गहाण ठेऊन धनुष्यबाण घेऊन दिला; लेकानं गोल्ड जिंकत सुवर्णक्षण कमावला, वडिलांना आनंदाश्रू
आईनं सोनं गहाण ठेऊन धनुष्यबाण घेऊन दिला; लेकानं गोल्ड जिंकत सुवर्णक्षण कमावला, वडिलांना आनंदाश्रू
Plane Hijack: विमानात वाद अन् दाबला गेला हायजॅकिंगचा कोड! अलर्टने इस्रायल-सौदीत उडाली धावपळ, फ्लाय दुबईच्या विमानात नेमकं काय घडलं? तासाभराच्या थरारानंतर अखेर सत्य समोर
विमानात वाद अन् दाबला गेला हायजॅकिंगचा कोड! अलर्टने इस्रायल-सौदीत उडाली धावपळ, फ्लाय दुबईच्या विमानात नेमकं काय घडलं? तासाभराच्या थरारानंतर अखेर सत्य समोर
Maharashtra Goverment On Agniveer: ना परीक्षा, ना ट्रेनिंग, कुठलीही अट नाही; अग्निवीरांना पोलिसांच्या पदावर घेणार, महाराष्ट्र सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय
ना परीक्षा, ना ट्रेनिंग, कुठलीही अट नाही; अग्निवीरांना पोलिसांच्या पदावर घेणार, महाराष्ट्र सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय
Manoj Jarange Defender Car : मनोज जरांगेंनी वापरलेली 'ती' वादग्रस्त डिफेंडर गाडी सोलापूर जिल्ह्यात परतली; गावोगावी गाडीची पूजा, नागरिक म्हणाले, 'गाडीमध्ये ज्या सिटावरती हे आमचं दैवत बसलं होतं....'
मनोज जरांगेंनी वापरलेली 'ती' वादग्रस्त डिफेंडर गाडी सोलापूर जिल्ह्यात परतली; गावोगावी गाडीची पूजा, नागरिक म्हणाले, 'गाडीमध्ये ज्या सिटावरती हे आमचं दैवत बसलं होतं....'
Thane Crime Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकरांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट, म्हणाले, 'एक तर आपला अध्याय संपेल किंवा नवीन अध्याय सुरू होईल'
प्रदीप पूर्णेकरांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट, म्हणाले, 'एक तर आपला अध्याय संपेल किंवा नवीन अध्याय सुरू होईल'
Thane Crime Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकरांच्या मृतदेहाचा CT स्कॅन रिपोर्ट समोर, एक मानेतून आरपार, दुसरी गोळी छातीत अडकली; थरकाप उडवणारा रिपोर्ट
प्रदीप पूर्णेकरांच्या मृतदेहाचा CT स्कॅन रिपोर्ट समोर, एक मानेतून आरपार, दुसरी गोळी छातीत अडकली; थरकाप उडवणारा रिपोर्ट
Sanjay Raut on Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकरांना का संपवलं? संजय राऊतांनी सगळंचं काढलं, अमली पदार्थ, बिल्डर अन् वाद, पोलिस आयुक्तासह गृहविभागावर व्यक्त केला संताप
प्रदीप पूर्णेकरांना का संपवलं? संजय राऊतांनी सगळंचं काढलं, अमली पदार्थ, बिल्डर अन् वाद, पोलिस आयुक्तासह गृहविभागावर व्यक्त केला संताप
Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: आरोपी एकत्र उभे होते आणि मला बघून ते दचकले; वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूनंतर मुलाची धक्कादायक माहिती
आरोपी एकत्र उभे होते आणि मला बघून ते दचकले; वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूनंतर मुलाची धक्कादायक माहिती
Embed widget