पुणे : पुण्यात सुरु असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवााला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शास्त्रीय (Sawai Gandharva Mahotsav Pune 2023) गायनाची परंपरा चालवणारा हा महोत्स दिवसेंदिवस मोठ्या पातळीवर होताना दिसत आहे. देशातून, राज्यातूनच नाही, तर परदेशातूनही संगीताची साधना करणाऱ्या कलाकारांची मांदियाळी बघायला मिळत आहे. मागील 69 वर्षांपूर्वी सुरू केलेला हा महोत्सव अजूनही मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात संगीतप्रेमी साजरा करताना दिसतात. 


आज कोणाचं गायन? 


आज सवाई गंधर्व महोत्सवात रजत कुलकर्णी यांचं  गायन, श्रीमती पद्मा देशपांडे यांचं गायन, नीलाद्री कुमार यांचं सतार वादन पं. अजय पोहनकर आणि अभिजित पोहनकर यांचं गायन होणार आहे. त्यात नीलाद्री कुमार यांचं सतार वादन प्रसिद्ध आहे, ते पाहण्यासाठी पुण्यातील संगीतप्रेमी उपस्थित राहणार आहे. 


'नाम गाऊ, नाम ध्यावू, नामे विठोबाला पाहू' या अभंगात प्रेक्ष तल्लीन


काल युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेवाती घराण्याच्या गायिका अंकिता जोशी यांच्या दमदार आणि तयारीच्या सादरीकरणाने 69 व्या 'सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा'च्या दुसऱ्या  दिवसाचा पूर्वार्ध गाजवला होता. त्यानंतर सतारीवर झंकारलेला 'मारवा' ही दाद मिळवणारा ठरला होता अंकिता जोशी यांनी आपल्या गायनाची सुरवात राग 'मुलतानी'ने केली. 'गोकुल गाव का छोरा' या पारंपरिक रचनेतून आणि त्याला जोडून 'अजब तेरी बात' या बंदिशीतून तसेच 'आये मोरे साजनवा' या द्रुत रचनेतून त्यांनी रागमांडणी साधली. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील झरीना या व्यक्तिरेखेसाठी पार्श्वगायन केलेली 'दिल की तपिश' ही राग किरवाणीवर आधारित रचना त्यांनी सादर केली. रसिकांनी या रचनेला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. अंकिता यांनी 'नाम गाऊ, नाम ध्यावू, नामे विठोबाला पाहू' या अभंगाने गायनाची सांगता केली. रसिकांच्या प्रतिनिधी या नात्याने अपर्णा कामतेकर यांच्या हस्ते यावेळी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. त्यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर यांनी, संवादिनीवर अभिनय रवंदे तसेच खंजिराची साथ धनंजय कंधारकर यांनी व टाळांची साथ माऊली टाकळकर यांनी केली. तानपुरा साथ मानसी महाजन आणि अदिती रवंदे यांनी केली.


विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या सुरेल गायनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध


विख्यात गायिका विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या सुरेल गायनाने 'सवाई' च्या दुसऱ्या दिवसाचा उत्तरार्ध स्मरणीय झाला. जयपूर अत्रौली घराण्याचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या विदुषी अश्विनी भिडे यांनी सुरवातीला राग काफी कानडा मांडला. विलंबित त्रितालातील 'लायी रे मदपिया' ही पारंपरिक बंदिश आणि त्याला जोडून हवेली संगीतातील 'कान्हकुवर के करपल्लव पर मानो गोवर्धन नृत्य करे' ही रचना द्रुत त्रितालात त्यांनी सादर केली. अतिशय शांत पद्धतीने रागविस्तार हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते. रसिकांना आपल्या गायनातून त्यांनी मंत्रमुग्ध केले.


इतर महत्वाची बातमी-


Deepika Padukone : दीपिका पादुकोणला हॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याच्या मुलाची व्हायचं होतं आई; अभिनेत्रीचा खुलासा