Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये दीपिका पादुकोणचा समावेश होतो. दीपिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका म्हणत आहे की,"हॉलिवूड अभिनेता विन डीजलच्या (Hollywood Actor Vin Diesel) मुलाची आई होण्याची माझी इच्छा होती". 


दीपिकाला आवडायचा विन डीजल


दीपिका पादुकोणचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती बॉलिवूड अभिनेता विन डीजलसोबत (Vin Diesel) दिसत आहे. एका चॅट शोमध्ये ते त्यांच्या सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहेत. दरम्यान त्यांनी सिनेमांसह वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलं. दीपिकाने त्यावेळी विन तिला आवडत असल्याचं सांगितलं होतं. 


दीपिकाला व्हायचं होतं विन डीजलच्या मुलाची आई (Deepika Padukone Wished Having Babies With Vin Diesel)


'द एलेन डिजेनर्स शो' या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दीपिका पादुकोणने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने विन डीजलबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. अभिनेत्री म्हणाली होती की,"मी विन डीजलची मोठी चाहती असून त्याच्या मुलाची आई होण्याचाही मी विचार केला होता". दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.


दीपिकाने विनबद्दल भाष्य केलं तेव्हा तिचा अभिनेता रणवीर सिंहसोबत (Ranveer Singh) साखरपुडा झाला होता. रणवीरसोबत साखरपुडा झाल्यानंतर दुसरा कोणाचा विचार कशी करू शकते यावरुन नेटकऱ्यांनी दीपिकाला प्रचंड ट्रोल केलं होतं. दीपिकाच्या या वक्तव्याने रणवीरचे चाहते मात्र नाराज झाले होते. 


दीपिका पादुकोणने 2017 मध्ये 'XXX: Return Xander Cage' या सिनेमाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात दीपिकासोबत विन डीजल मुख्य भूमिकेत होता. या सिनेमातील दीपिकाच्या बोल्डनेस आणि लुक्सचं खूप कौतुक झालं होतं. दीपिकाचा हा हॉलिवूड अॅक्शनपट होता. पण सहकलाकार विन डीजलसोबत संसार थाटण्याच्या वक्तव्यामुळे दीपिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.


दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे. सिनेमाच्या सेटवर त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. 2015 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं. दीपिका-रणवीरच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.


पाहा व्हिडीओ



संबंधित बातम्या


Year Ender 2023 : दीपिकाची भगवी बिकिनी ते 'आदिपुरुष'मधील 'तो' डायलॉग; 'या' वर्षात बॉलिवूड अडकलं वादाच्या भोवऱ्यात