एक्स्प्लोर

Pune University helmet : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात दुचाकी वापरणाऱ्यासाठी नवा नियम; अन्यथा होणार दंड

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात मोटारसायकलवरून येणाऱ्या व्यक्तींसाठी सुरक्षेचा महत्त्वाचा नियम नुकताच लागू करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या आवारात प्रवास करताना सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Pune University helmet : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात मोटारसायकलवरून येणाऱ्या व्यक्तींसाठी सुरक्षेचा महत्त्वाचा नियम नुकताच लागू करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या आवारात प्रवास करताना सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे निर्देश विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यापीठाला भेट देणाऱ्या कोणत्याही नागरिकांना लागू आहेत. त्यामुळे आता विद्यापीठाच्या परिसरात आता सगळ्यांना हेल्मेट घालूनच प्रवेश मिळणार आहे. 

हा निर्णय मोटार वाहन कायदा 1988 मध्ये नमूद केलेल्या नियमांशी संबंधित आहे. या कायद्यानुसार हेल्मेट न वापरणे हा दंडनीय गुन्हा मानला जाईल. त्यामुळे सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, शाळा, महाविद्यालये, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांनी या सुरक्षिततेचे पालन करणे बंधनकारक आहे.

मोटार वाहन कायद्यातील कलम 129 चे काटेकोपणे पालन व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश जारी केले आहेत. या निर्देशांच्या अनुषंगाने विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रक काढून विद्यापीठाच्या आवारात दुचाकीवरून प्रवास करताना सर्व कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे. हेल्मेट नियमाचे पालन न केल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार शिक्षा होईल, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह व्यक्तींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यावर भर दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनांवर भर देत डॉ. काळे यांनी   विद्यापीठाच्या आवारात दुचाकींचा वापर करताना हेल्मेट घालणे आवश्यक असल्याचं सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात लाक्षणिक हेल्मेट दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी पुणे शहरातील सगळ्या शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याचं आवाहन केलं होतं शिवाय अनेक शासकीय कार्यालयासमोर वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते पुण्यातील विविध कार्यलयाच्या बाहेर ट्रॅफिक पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली होती. त्यात तब्बल 622 शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.

सुरुवातीला जनजागृती करणे आणि सरकारी कार्यालयात येणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्यास प्रोत्साहित करणे यावर भर दिला जाईल. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवरही कडक कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.  हा उपक्रम सुलभ करण्यासाठी, विद्यमान वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयांच्या आजूबाजूच्या भागात नियुक्त करण्यात आले होते. त्यात तब्बल 622कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. आता विद्यापीठातदेखील अशीच कारवाई करण्यात येणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

उमेश पाटील माझ्या नादाला लागू नका, पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा, आमदार विक्रम काकडेंचा हल्लाबोल, राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उघड 
उमेश पाटील माझ्या नादाला लागू नका, पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा, आमदार विक्रम काकडेंचा हल्लाबोल, राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उघड 
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget