पुणे : संत तुकाराम महाराजांच्या (Sant Tukaram Maharaj) पालखीतील गोंधळानंतर आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Sant Dnyaneshwar Maharaj) पालखीत गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. माऊलींच्या पालखी सोहळा आज साताऱ्यातून पुणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. त्यानंतर पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं निरास्नान झाल्यानंतर वारकरी आक्रमक झाले आहेत. सर्वांना पादुकांचं दर्शन न दिल्यानं वारकऱ्यांचा ठिय्या.. परंपरा मोडीत काढू नका अशी मागणी वारकऱ्यांनी केली. त्यानंतर विश्वस्त मंडळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे आज निरामधील दत्त घाटावर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत केलं जातं. त्यानंतर माऊलींच्या पादुका पालखीतून बाहेर काढल्या जातात. पादुकांचं निरा नदीच्या पाण्याने स्थान घातले जाते. गेले अनेकवर्ष या स्नानाची परंपरा सुरु आहे. मात्र नीरा स्नान झाल्यानंतर पुढच्या विणेकरांना फक्त पादुकांचे दर्शन दिलं. परंतु मागच्या रथामागे चालणाऱ्या वारकऱ्यांना पादुकांचे दर्शन न दिल्यामुळे वारकरी आक्रमक झाले आहेत. रथामागे चालणाऱ्या दिंडीच्या विणेकरांना दर्शन देत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी वारकऱ्यांची भूमिका घेतली.
दिंड्या मागे ठेवून माऊलींची पालखी निघाली पुढे
वारकऱ्यांच्या मागणीनंतर रथमागे पादुका आणल्या परंतु वारकरी आपल्य मागणीवर ठाम आहेत. माऊलींच्या पादुका आमच्यापर्यंत आल्या पाहिजेत अशी मागणी होती. तर पादुका सगळ्यांपर्यंत पोहोचणार नाहीत असा विश्वस्त मंडळाचा आग्रह होता. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा रथ गेला. मात्र मागच्या दिंड्या मात्र एकच ठिकाणी थांबून आहेत. पालखी पुढे गेल्यानंतर साधारणतः अर्ध्या तासाने या दिंड्या पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. नित्याचे भजन करून संध्याकाळच्या समाज आरतीला आम्ही याचा निषेध करू असं मागच्या दिंडीतील वारकऱ्यांचे म्हणणं आहे.
आषाढी वारीच्या एकूण मार्गांमध्ये चार वेळा पादुकांना स्नान
आषाढी वारीच्या एकूण मार्गांमध्ये चार वेळा ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं. सगळ्यात आधी आळंदीतून प्रस्तान होण्याआधी माऊलींच्या पादुकांना इंद्रायणी नदीमध्ये स्नान घातलं जातं. त्यानंतर पंढरपूरवा निरा नदीमध्ये स्नान घातला जातं आणि शेवटी पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये स्नान घातलं जातं. परतीच्या प्रवासात देखील माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घातले जाते.
हे ही वाचा :
संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय; वर्षानुवर्षाची विसाव्याची परंपरा खंडीत, उरुळी कांचनमधील मुक्काम बदलला