पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढतच आहे आता (Pune Crime News)  ही गुन्हेगारी पुण्यातील थेट गुडलक चौकापर्यंत म्हणजेच सगळ्यात रहदारीच्या रस्त्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. पुण्यातील गुडलक कॅफेच्या मागे व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.  या व्हेल माशाच्या उलटीची किंमत तब्बल पाच कोटी रुपये आहे.


पुण्यातील गुडलक कॅफे हा फर्ग्यूसन रस्त्यावर आहे. या रस्त्यावर मोठी रहदारी असते. याच कॅफेच्या मागे एक व्यक्ती व्हेल माशाची उलटी गैरकायदेशिरित्या विक्री करत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. विश्वनाथ गायकवाड या व्यक्तीची तपासणी केली असता. त्याच्या बॅगमधून पाच कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी सापडली. 


आधी उडवाउडवीची उत्तरं दिली...


माहिती मिळाल्यावर विश्वनाथ गायकवाड याची चौकशी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी गायकवाड याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र काही बाबींमुळे पोलिसांचा संशय बळावत होता. त्यामुळे त्यांची कसून चौकशी केली आणि बॅग बघितल्यावर व्हेल माशाची उलटी पोलिसांना सापडली. ही उलटी पोलिसांनी जप्त केली आहे. 


भारतापेक्षा विदेशात मोठी मागणी 


व्हेल माशाच्या उलटीला भारतात सोबतच विदेशातही मोठी मागणी आहे. भारतात व्हेल माशाच्या उलटीसाठी एक किलोसाठी 1 कोटी रुपये भाव आहे. तर परदेशात एका किलोसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात या उलटीची किंमत प्रतिकिलो 3 ते 4  कोटी एवढी आहे. व्हेल माशाच्या उलटीचा मोठा उपयोग होतो. त्यामुळेच या उलटीला मोठी किंमत आहे.


अतिउच्च प्रतीच्या सुगंधी द्रव्यासाठी होतो उपयोग 


व्हेल माशाच्या उलटीचा वापर हा भारतात आणि विदेशात अतिउच्च प्रगतीच्या सुगंधी द्रव्य, परफ्युम बनविण्यासाठी होतो. सुगंधी अगरबत्तीतही या व्हेल माशाच्या उलटीचा वापर होतो. तर उलटीमुळे परफ्युमचा सुगंध हा खूप काळ टिकतो. व्हेल माशाच्या एक किलो उलटीमध्ये तब्बल दहा हजार लिटर महागडे अत्तर परफ्युम, रोजच्या वापरातील सेंट तयार करण्यात येते. तर या उलटीतून बाजारात एक किलोमध्ये हजारो कोटीची उलाढाल होते. त्यामुळे उलटीला मोठी किंमत आहे.


उलटी किंवा व्हेल माशाचा भाग बाळगणे शिक्षेस पात्र  


हजारो कोटींची उयलाढाल बाजारात करणाऱ्या व्हेल माशाच्या उलटी किंवा व्हेल माशाचा कुठलाही भाग जवळ बाळगणे हे वन कायद्यानुसार गुन्हा असून तो शिक्षेस पात्र आहे. सदर प्रकरणी जामीनपात्र गुन्हा दाखल करून दोषी आढळल्यास किमान तीन वर्ष आणि कमाल 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा या कायद्यांतर्गत तरतूद आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Pune Crime News : लष्करी अधिकारी म्हणून वावरत असलेला तरुण पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद