पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर(Pune Crime News)  मोठ्या प्रमाणात सुरक्षा बाळगण्याची गरज असल्याचं समोर आलं आहे. लष्करी अधिकारी म्हणून वावरत असलेल्या तरुणाला पुणे रेल्वे स्थानकावर पकडण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे, लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला तो सुरक्षा पासशिवाय प्रवेश करून सहभागी झाला होता आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्याचा फोटोही काढल्याचं तपासात समोर आलं आहे. 


भारतीय लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स (MI) दक्षिण कमांडकडून मिळालेल्या माहितीवरून, नीरज विक्रम विश्वकर्मा (20) हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.  काल रात्री त्याला रेल्वे संरक्षण दलानं पकडलं आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर अधिक सुरक्षा वाढवण्याची गरज असल्याचं समोर आलं. 


या विक्रम विश्वकर्माची तपासनी केली असता त्यांच्याकडे अनेक चिंता व्यक्त करणारे पुरावे सापडले. नीरज विश्वकर्मा यांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यादरम्यान नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याला भेट दिली होती, सर्वांनी लेफ्टनंट रँक असलेल्या एलिट पॅरा स्पेशल फोर्सेस (पॅरा एसएफ) सारखा लष्कराचा गणवेश परिधान केला होता. सशस्त्र दलाचा सेवारत सदस्य म्हणून उभा होता. या फोटोमुळे नवी दिल्लीतील एवढी सुरक्षा असलेल्या कार्यक्रमात तो पोहचला कसा?, असा प्रश्न निर्माण होतो. त्याच्या मोबाईलची तपासनी केली असता त्यात काही संशयित फोटोदेखील सापडले आहे. या फोटोत तो लष्करी जवानांच्या सहवासात असल्याचे दिसून आलं आहे. एवढंच नाही तर  नीरज विश्वकर्मा यांच्याकडे बनावट कॅन्टीन कार्ड असल्याचे आढळून आले, जे विशेषत: सेवारत किंवा सेवानिवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांना देण्यात येतं. 


लष्कराशी संबंधित हे सगळे पुरावे त्यांच्याकडे आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या विश्वकर्माची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. हा एकटाच होता की यांचे काही साथीदार आहेत का? बनावट लष्करी अधिकारी म्हणून ते का वावरत आहे? आणि त्यांचा कोणत्या देशविरोधी संघटनेशी संबंध आहे का? याची सध्या चौकशी केली जात आहे. त्यामुळे या चौकशीसाठी त्याला पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे. 


पुणे स्थानकावर सुरक्षेची गरज....


पुणे स्थानकावर रोज लाखो नागरिकांची येजा असते. त्यामुळे असे बवावट अवतार करुन फिरणारे सर्रास प्रवास करत असतात. या पूर्वीही अशा घटना घडल्या आहे. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून आता पुणे पोलीस स्टेशनवर AI ची नजर असणार आहे. जे प्रवाशांच्या संशयित हालचाली टिपायला मदत करणार आहे.


 इतर महत्वाच्या बातम्या :