एक्स्प्लोर

Pune Pmc Recruitment News: पुणे महापालिकेतील पदभरतीसाठीचं परीक्षा शुल्क कमी करा; आयुक्तांना निवेदन

पुणे महापालिका पदभरतीसाठी घेण्यात येणारं परीक्षा शुल्क कमी करण्यात यावा, त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांना दिलासा मिळेल. यासाठी  महानगरपालिका आयुक्तांना भाजपतर्फे निवेदन देण्यात आलं.

Pune Pmc Recruitment News: पुणे महापालिका पदभरतीसाठी घेण्यात येणारं परीक्षा शुल्क कमी करण्यात यावा, त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांना दिलासा मिळेल. यासाठी  महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भाजपतर्फे निवेदन देण्यात आलं. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

पुणे महानगरपालिका (PMC) विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 448 रिक्त पदं काढण्यात आली आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच, 20 जुलै 2022 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट pmc.gov.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. मात्र या अर्जासाठी शुल्क भरपूर असल्याने ही मागणी करण्यात आली आहे.

जाहिरातीमार्फत गट 2 मधील 4 पदे तर गट 3 मधील 444 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून दहा ऑगस्ट पर्यंत अर्ज मागवले आहेत. पद भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी शुल्क खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी  1000 रुपये तर मागसप्रवर्गाच्या उमेदवारासाठी 800 रुपये ऑनलाईन पद्धतीने आदा करावे अशी जाहीरातीमध्ये सूचना देण्यात आली आहे. 

या जाहिरातीला अनुसरून राज्य भरातून परीक्षेसाठी अर्ज येण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे राज्यात अनेक दिवस लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. अशा परिस्थितीत अनेकांची एक हजार रुपये व आठशे  रुपयांचे परीक्षा शुल्क भरणे कठीण जाणार आहे. तसेच पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवासखर्च ही सहन करावा लागणार आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन आपण या परीक्षेसाठी लागणारे परीक्षा शुल्क कमी करून ते दोनशे ते पाचशे रुपयांच्या आत करावे ही विनंती. याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास नाईलाजास्तव आम्हाला भारतीय जनता पार्टी मार्फत आंदोलन करावे लागेल. असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.

 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
Chakan MIDC Pune News: चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Embed widget