एक्स्प्लोर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी, सर्व शाळांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  हवामान विभागाने उद्या पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे.

पुणे :  मुंबईस ठाणे, पालघर, कल्य़ाण डोंबिवली पुणे तसेच कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आले आहे. या पावसामुळं  मुंबईसह ठाण्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याचबरोबर आता पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  हवामान विभागाने उद्या पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

 नागरिकांनाही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे

 नागरिकांनाही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन  डुडी  यांनी केले आहे.

 मुंबई विद्यापीठाच्या 6 जुलैला होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या मुसळधार पाऊस व अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून मुंबई विद्यापीठाच्या दिनांक 6 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. सदर परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील सूचना पाहाव्यात. विद्यार्थी, महाविद्यालये आणि संबंधित सर्वांनी याची नोंद घ्यावी.

सोमवारी मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहणार 

मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सोमवार म्हणजे उद्या दिनांक 6 जुलै 2026  रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात देखील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली, बदलापूरमध्ये देखील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला उद्या सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा ( Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या, दिनांक 6 जुलै 2026 रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. मात्र, शासकीय व खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील.  आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असेदेखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पालघर आणि रायगड जिल्ह्यात देखील  शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर आणि रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी (6 जुलै) अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी रायगड, नाशिक, पुण्यासह सातारा घाटमाथा परिसरासाठी 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी करण्यात आला आहे, तर मुंबई आणि ठाण्यासह इतर किनारी जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि लहान मुलांचे हाल होऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ खबरदारीचे पाऊल उचलले आहे.

शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली, तरी प्रशासकीय यंत्रणा मात्र पूर्णपणे सतर्क मोडवर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, या सुट्टीच्या कालावधीत सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत किंवा कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार या सर्व कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या (Disaster Management) कामात मदत करावी लागणार आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंची शिवसेना आक्रमक, एकनाथ शिंदे आणि शायना एन सी यांच्या फाडलेल्या पोस्टरचं मुठा नदीत विसर्जन, नेमकं प्रकरण काय? 
ठाकरेंची शिवसेना आक्रमक, एकनाथ शिंदे आणि शायना एन सी यांच्या फाडलेल्या पोस्टरचं मुठा नदीत विसर्जन, नेमकं प्रकरण काय? 
तेजस्वी सातपुतेंची बदली भोंदू खरातच्या माध्यमातून झाली, चाकणकरांच्या सांगण्यावरून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप
तेजस्वी सातपुतेंची बदली भोंदू खरातच्या माध्यमातून झाली, चाकणकरांच्या सांगण्यावरून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप
Pune Crime Daund: आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
Pune Crime News: पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget