पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक  (Pune Drugs)  आणि राज्याला हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील तरुणाई नशेत टुल्ल असल्याचं या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. अभिनेते रमेश परदेसी यांनी हा व्हिडीओ समोर आणल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर आज या टेकडीवर नेमकं काय घडलं? हे स्वत: सांगितलं आहे.


रमेश परदेसींनी सांगितला संपूर्ण प्रकार....


रमेश परदेसींनी एबीपी माझाशी बोलताना हा संपूर्ण प्रकार सांगितला.  ते म्हणाले की,     गेली अनेक वर्ष वेताळ टेकडीवर पळायला येतो. पळत असताना अचानक दोन तरुणी टेकडीवर झोपलेल्या दिसल्या. एक तरुणी झाडाला टेकून होती आणि एक तरुणी खाली झोपलेली होती.  त्या तरुणींच्या जवळ जाऊन बघितल्यावर त्यांच्या तोंडाला फेस आल्यासारखा दिसला. हे पाहताच मी दोन मुलांना आवाज दिला आणि त्यांची मदत घेऊन मोकळ्या हवेत घेऊन आलो. त्यानंतर त्यांना काय होत आहे, हे आमच्यातील कोणालाही कळत नव्हतं. आम्ही शुद्धीत असलेल्या मुलीला पाणी प्यायला दिलं तर तिथे थेट उलटी केली. त्यानंतर टेकडीवर व्यायामाला आलेल्या अनेकांची मदत मागितली मात्र काहींनी मदत केली तर काहींनी दुर्लक्ष केलं. त्यानंतर धाडवे पाटील नावाच्या मित्राची कार घेतली आणि दोन्ही मुलींना दवाखान्यात दाखल केलं आणि या संपूर्ण प्रकाराची पोलिसांना माहिती दिली.



ते पुढे म्हणाले की,  वेताळ टेकडीवर यापूर्वीदेखील हे प्रकार अनेकदा दिसले. अनेक कॉलेज तरुण-तरुणी सनसेट पाहण्यासाठी टेकडीवर कोल्ड्रिंग्स वगरे घेऊन जातात. त्यामुळे या सर्वाची कल्पना यापूर्वी आली नाही. अनेक मुलं नियंत्रित असल्यामुळे हा प्रकार कादचित लक्षात आला नाही. मात्र यापूर्वी अनेकदा असे प्रकार दिसले त्यांना आम्ही थांबवण्याचाही प्रयत्न अनेकदा केले आहेत. त्यांना टेकडीवरुन जाण्यासदेखील सांगितलं आहे.


प्रकार पाहून अंगावर काटा आला...


हा सगळा प्रकार पाहून काही वेळ तरुणाई कोणत्या दिशेने चालली आहे, याचा अंदाज बांधून अंगावर काटा आला. महाराष्ट्रात एकीकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्स कारवाई केली जात आहे. मात्र पुरवठा करण्यात आलेल्या ड्रग्सचं प्रमाण कारवाई केलेल्या ड्रग्सपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. राज्याचा उडता पंजाब होऊ नये, अशी ईच्छा रमेश परदेशींनी व्यक्त केली आहे. 






इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News : पुण्यातील तरुणाई नशेत तुल्ल; पिट्या भाईंनी समोर आणला राज्याला हादरवणारा व्हिडीओ...