एक्स्प्लोर

Punjabi singer Sidhu Moosewala:  पोटच्या पोरानं कोणाचातरी जीव घ्यावा, असं कोणत्या आईला वाटणार?

Punjabi singer Sidhu Moosewala: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.  मंचरचा आरोपी संतोष जाधवच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Punjabi singer Sidhu Moosewala:  आपल्या मुलाने कोणाची हत्या करावी किंवा वाईट वळणाला लागावं असं कोणत्याच आईला वाटत नाही. उलट त्याने आपलं नाव मोठं करावं. देशासाठी काहीतरी करावं, असंच प्रत्येक पालकाला वाटत असतं, असं सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या संतोष जाधवची आई सांगत होती. सिता जाधव असं आरोपी असलेल्या संतोषच्या आईचं नाव आहे. त्याची आई खासगी दवाखान्यात मदतनीस म्हणून काम करते. 

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.  मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात 8 लोकांची छायाचित्रं समोर आली होती. त्यातलाच संतोश जाधव हा आरोपी पकडण्यात आला. संतोषचं मुळ गाव  पुण्यापासून काही अंतर असलेलं मंचर आहे.

मला दोन मुले आहेत. मोठा संतोष आणि लहान मुलगी आहे. गेले दीडवर्ष झाले संतोष आणि माझी भेट झाली नाही आहे. त्यानंतर संतोष माझ्यासमोर आरोपी म्हणूनच आला. 10 वर्षांपुर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर संतोषच्या वागण्यात बदल झाला होता. सतत मारामारी, भांडणं यातच असायचा. मी अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की हे मारामारी वगैरे गैर आहे. मात्र वडिलांचं छत्र नसल्याने त्याला घरात कोणाचा धाक नव्हता. त्यामुळे त्याला आवरणं कठिण झालं होतं, असं त्याची आई सांगते.

मित्राची वाईट संगत
अनेक वर्षांपासून त्याला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले मित्र होते. मात्र त्यातल्या वाईट मित्रांच्या संगतीत संतोष लागला. लहानपणापासून तो फार घरी नसायचा. त्याला त्याचे मित्र प्रिय वाटायचे. घरात लहाण बहिण आहे, याचंही भान त्याला कधीच नव्हतं. त्यामुळे काहीही करायचं असेल तर आम्ही दोघीच करत होतो. वडिल गेल्यापासून त्याने त्याचं वेगळं जग निर्माण केलं होतं. त्या जगात आई-बहिणीसाठी जागा नव्हतीच आणि विचारही नव्हता. आईजवळ सगळेच गुन्हे माफ आहे, असं त्याला वाटत असेल. संतोषला आपल्या वयाच्या लोकांची संगत नव्हती. त्याचे सगळे मित्र त्याच्यापेक्षा वयाने मोठे होते आणि पैशानेही मोठे होते. पैशाचं वेड माणसाला वेडं करतं. त्याच्या मित्रांच्या संगतीनेच तो वाईट मार्गाला लागला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

गेले अनेक दिवस फरार होता
गेल्या 1 ऑगस्टला संतोषने ओंकार उर्फ राण्या बाणखेलेची हत्या केली होती. या हत्येनंतर संतोष त्याच्या साधीदारासह फरार झाला होता.  याच प्रकरणासाठी गेले अनेक दिवस मंचर पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तेव्हापासून तो फरार होता. त्याच्यावर मोक्कासुद्धा लावण्यात आला होता. त्याच्या आतापर्यंत अनेक चोऱ्या, मारामारी यासंदर्भातील गुन्हे दाखल आहे. मात्र आता त्याचं नाव सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात देखील समोर आलं आहे. 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
Ketan Agrawal Case: 'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!
'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Embed widget