पुणे : रोजगाराच्या शोधात पुण्याला आलेल्या तरुणाने मित्र भाड्यावर राहत असलेल्या खोलीत आत्महत्या केली. 25 वर्षीय अविनाश वाघमोडेने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
पुण्यात राजेंद्रनगरमधील पीएमसी कॉलनीत हा प्रकार घडला. अविनाश तीन-चार दिवसांपूर्वी पुण्यात कामाच्या शोधात आला होता. तो मित्राच्या खोलीवर राहत होता. मात्र यात्रा असल्यामुळे त्याचा मित्र गावी गेला होता. दुपारच्या वेळी अविनाशने गळफास घेतला.
दिवसभर दरवाजा बंद असल्यामुळे शेजाऱ्यांनी खिडकीतून आत डोकावून पाहिलं, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.