लोणावळ्यातील लायन्स पॉईंटच्या दरीत पडून तरुणाचा मृत्यू
सोमवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि पोलिसांना यश आलं. नचिकेत पवार असं या तरुणाचं नाव होतं.
Continues below advertisement
पुणे : दारूच्या नशेत लोणावळ्यातील लायन्स पॉईंटच्या दरीत पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री साडे बाराच्या सुमारास घडली. तर सोमवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि पोलिसांना यश आलं.
नचिकेत पवार असं या तरुणाचं नाव होतं. मूळचा हिंगोलीचा नचिकेत चार मित्रांसमवेत लोणावळ्यात फिरायला आला होता. तेव्हा एन्जॉय म्हणून नचिकेतने मद्यसेवन केलं आणि त्याच नशेत रात्री साडे बाराच्या सुमारास लायन्स पॉईंटच्या दरीत पडला.
400 फूट दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. नचिकेत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे ई सेवा केंद्र चालवत होता. पर्यटनस्थळांवर योग्य ती काळजी न घेतल्यामुळे अशा घटना घडल्याचं वारंवार समोर येत असतं. त्यामुळे पर्यटकांनी आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे.
Continues below advertisement