एक्स्प्लोर

Pune Weather Update : उन्हामुळे जीवाची लाहीलाही; रात्री गरमीनं हैराण; पुणं दिवसा चाळीशी पार तर रात्रीच्या तापमानातही वाढ

मार्च महिन्यातच पुण्यात (Pune Weather Update)  तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. पुण्यातील तापमानाने चाळीशी पार केली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या जीवाची दुपारी चांगलीच लाहीलाही होताना दिसत आ

पुणे : मार्च महिन्यातच पुण्यात (Pune Weather Update)  तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. पुण्यातील तापमानाने चाळीशी पार केली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या जीवाची दुपारी चांगलीच लाहीलाही होताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत  (Weather Forecast)  तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. दिवसाच नाही तर रात्रीदेखील पुणे तापताना दिसत आहे.  29 मार्च रोजी पुण्याच्या रात्रीच्या तापमानात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली होती. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार शिवाजीनगरचे तापमान 23.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा 6.1  अंश सेल्सिअसने अधिक आहे. कोरेगाव पार्क, वडगाव शेरी भागात 26 ते 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

'सध्या कमाल तापमान उच्च पातळीवर असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. २८ मार्चच्या रात्रीपासून पुण्यावर ढगाळ वातावरण वाढले आहे त्यामुळे लाँगवेव्ह रेडिएशनचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे साहजिकच गेल्या काही दिवसांत  उष्णता वाढली आहे. परिणामी रात्रीच्या वेळी तापमान अधिक असल्याचं दिसून आलं आहे, असं हवामानत खात्यानं सांगितलं आहे. 'उत्तर तामिळनाडू आणि नैर्ऋत्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा आहे. ती कर्नाटक आणि मराठवाडा भागातून जाते. या प्रणालीमुळे महाराष्ट्रातील काही भागातील हवामानावर परिणाम होत आहे. पुढील 24 तासांत विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा विभागातील काही भागात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे शहरात पुढील 72 तास अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान आणि कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही, असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.  गेल्या आठवडाभरापासून पुणे शहरात सरासरीपेक्षा अधिक तापमान ाची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. 27 मार्च रोजी कमाल तापमान 39.6  अंश सेल्सिअस इतके होते. 29 मार्च रोजी पुण्यात कमाल तापमान 39.1 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. मागील 24 तासांत तापमानात 3 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

पुण्यात तापमानात वाड होत असल्याने पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहनदेखील हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. दिवसभर पाणी पित राहणे,शक्यतो दुपारी बाहेर न पडणे आणि जास्त कष्ठाची कामं उन्हाच्या वेळी न करणे, असे खबरदारीचे उपाय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

Weather Update : महाराष्ट्रात पावसाची शक्यता; पुढील आठवड्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज

 
 
 

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Pune Moshi Building Collapse: 'यंदा वारीला गेले असते तर...'; मोशी दुर्घटनेत काळजाला घर पाडणारी कहाणी, अवघ्या 25 दिवसांच्या चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं
'यंदा वारीला गेले असते तर...'; मोशी दुर्घटनेत काळजाला घर पाडणारी कहाणी, अवघ्या 25 दिवसांच्या चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
Embed widget