पुणे :  पुण्यातील (Pune News )  वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर (Wadgaosheri Constituency)  भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik)  यांनी दावा केला आहे.  सध्या या मतदार संघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे (Sunil Tingre)  आमदार असल्याने महायुतीत वादाची शक्यता आहे.  मात्र महायुतीत जागावाटप होण्याआधीच जगदीश मुळीक यांनी आगामी विधानसभा निवडणूक वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून लढवणार असल्याचा दावा केला आहे. तसे फ्लेक्स मुळीक यांच्या समर्थकांकडून मतदारसंघात लावण्यात आलेत. 


जगदीश  मुळीक हे टिंगरे यांचे परंपरागत विरोधक असून त्यांनी विधानसभेची एक निवडणूक टिंगरेंच्या विरोधात जिंकली होती तर एका निवडणुकीत त्यांनी पराभव पत्करावा लागला होता. यामुळे महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. वडगावशेरी  मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून जगदीश मुळीक विधानसभाच्या तयारीला लागले आहेत. लोकसभेसाठी जगदीश मुळीक हे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र भाजपने   जगदीश मुळीक यांचं तिकीट कापत मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेची उमेदवारी दिली होती.  लोकसभा निवडणुकीला एक पाऊल मागे घेत  मुळीक यांनी मुरलीधर मोहोळ यांचा जोर दार प्रचार केला, म्हणून आता मुळीक यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. तशी त्यांनी कामाला सुरुवात देखील केली आहे. 


पोर्शे प्रकरणात सुनील टिंगरे चर्चेत 


परंतु  सध्या वडगावशेरीचे   विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे बंडखोरीनंत शरद पवार गटामध्ये सहभागी न होता अजित पवार यांच्याबरोबर गेले.  पुण्यातील पोर्शे प्रकरणानंतर  सुनील टिंगरे हे चांगलेच चर्चेत होते. पोर्शे  प्रकरण पुण्यातल्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचलं.  आमदार सुनील टिंगरे यांनी प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला अशी चर्चा होती. परंतु   आपण फक्त आढावा आणि माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो असं स्वतः सुनील टिंगरे यांनी माध्यमापुढे येऊन सांगितलं होते. पण अजूनही  हा  विषय संपलेला नाही.  त्यामुळे आता ही जागा सुनील टिंगरे यांचा विचार होणार का, याकडे वडगावशेरीमधील मतदारांच लक्ष लागलं आहे.


सुनील टिंगरेंचा विचार होणार का?


दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच अजित पवार पक्षचा झालेल्या पराभवामुळे विधानसभेला दादांच्या पारड्यात किती जाग पडतील यांची खात्री नाही. या मधील वडगावशेरी विधानसभेची जागा मिळेल का, याविषयी शंका आहे.   दुसरीकडे सुनील टिंगरे यांच्यावर पक्षाची नाराजी असल्याच्या चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे. जरी उमेदवारी  दिली  तरी पोर्शे प्रकरणानंतर मतदार कौल देतील का? असा देखील सवाल आहे.  


वडगावशेरी मतदारसंघावरून महायुतीत महानाट्य रंगण्याची शक्यता


2014  विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार जगदीश मुळीक यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता.  त्यावेळी असलेल्या मोदी लाटेत शहरातील आठही मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले होते. त्यानंतर 2019 साली निवडणुकीत   तर वडगावशेरी, हडपसर हे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. या मतदारसंघातून एकदा विजयी झालेले भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक हे आता विधानसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जगदीश मुळीक हे लोकसभेसाठी देखील  निवडणूक  लढवण्यास इच्छुक होते. मुळीकांची लोकसभेची नाराजी विधानसभेला भाजप तिकिट देऊन दूर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे वडगावशेरी मतदारसंघावरून महायुतीत महानाट्य रंगण्याची शक्यता आहे.


हे ही वाचा :


पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना