पुणे : अकरा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी (Pune Ganesh Visarjan 2024) मंगळवारी निघालेल्या विसर्जन मिरवणुका 22 तासांनंतर आजही सुरू आहेत. पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे आणि दगडूशेठ हलवाई गणपतीचे रात्रीत विसर्जन झाले. मात्र त्यानंतर पुण्याची विसर्जन मिरवणूक रखडली आहे. अखिल मंडई मंडळ, शारदा गणपती मंडळ, भाऊसाहेब रंगारी मंडळाचं विसर्जन अद्याप बाकी आहे.
पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आलंय.. मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गुरुजी तालीम, मानाचा चौथा तुळशीबागेतील बाप्पा तर मानाचा पाचवा केसरीवाड्यातील गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय. पुण्याची गणपची विसर्जन मिरवणूक मंगळवारी सकाळी 10:30 वाजता सुरू झाली होती.
विसर्जन मिरवणुकीत आधी नंबर कोणाचा
मंडई , बाबू गेणू, भाऊसाहेब रंगारी या महत्त्वाच्या गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणूका मध्यरात्र उलटून गेल्यावर देखील अजून सुरूच झाली नाही. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे नऊच्या दरम्यान विसर्जन झाले. मात्र त्यानंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांमध्ये नंबर आधी कोणाचा यावरुन वाद झाला त्यामुळे विसर्जन मिरवणूक रेंगाळली. या मंडळांची मिरवणूक सुरू होत नसल्याने पाठीमागे असलेली मंडळेही रखडली.
मिरवणूक लवकरात लवकर संपवू : पुणे पोलीस आयुक्त
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, मिरवणुकीचं योग्य नियोजन करण्यात आले आहे. मात्र पुण्यातील मिरवणुकीत अनेक मंडळांनी लेसर लाइटचा वापर केला आणि सोबतच डीजेचा वापर केला आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस तैनात आहेत. मिरवणूक लवकरात लवकर संपवू, असाही त्यांनी सांगितलं. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे विसर्जन मिरवणुका उशिरापर्यंत चालणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मानाचा पहिला - कसबा गणपती
- 10:30 - मिरवणुकीची सुरुवात
- 11:10 - बेलबाग चौकात
- 3:35 - अलका चौक
- 4:32 - नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा दुसरा - तांबडी जोगेश्वरी
- 10:40 - मिरवणुकीला सुरुवात
- 12:00 -बेलबाग चौक
- 4:12 - अलका चौक
- 5:10 - नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा तिसरा - गुरुजी तालीम
- 11:10 - मिरवणुकीला सुरुवात
- 1:12 - बेलबाग चौक
- 5:16 - अलका चौक
- 6:43 - नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा चौथा - तुळशीबाग
- 11:50 - मिरवणुकीला सुरुवात
- 2:20 - बेलबाग चौक
- 6:17 - अलका चौक
- 7:12 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा पाचवा - केसरीवाडा
- 12:25 - मिरवणुकीला सुरुवात
- 3:23 - बेलबाग चौक
- 6:27 - अलका चौक
- 7:38 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन
हे ही वाचा :