पुणे पुण्यातील जीवघेणा स्टंट  (Pune Viral Video) तरुण आणि तरुणीला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. या दोघांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि पोलिसांचे त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातील या व्हायरल रीलमधील तरुणाचं नाव मिहीर गांधी तर तरुणीचं नाव मीनाक्षी साळुंखे असं असून हे दोघेही अॅथलीट असल्याची माहिती समोर आलीय. रील व्हायरल झाल्यानंतर या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना समज दिली.


पुण्यातील तरूण-तरूणींच्या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media)  व्हायरल झाला.पुण्यातील नऱ्हे परिसराती स्वामी नारायण मंदिराजवळ जीव धोक्यात घालून मुलं-मुली रील्स बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.  या मुलांच्या या रिलवर आता सगळीकडून संताप व्यक्त केला गेला.  असे व्हिडीओ तयार करुन प्रसिद्धी मिळवू नका, असं रिलस्टार अथर्व सुदामे सांगतोय तर रिल बनवण्यापेक्षा शिक्षणाकडे लक्ष द्या, असं आवाहन पालकांनी केलं आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाालकांचा मुलांवर वचक उरला नाहीये का? आणि अशा रिल्स तायर करणाऱ्यांवर पोलीस कधी कारवाई करणार?, असे प्रश्न उपस्थित होत होते.


 तरुणांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता


व्हायरल रिल झालेल्या तरुणांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.  तसेच हा व्हिडीओ एप्रिल महिन्यातील असल्याचा त्यांनी सांगितलय. दोघांना पोलीस स्टेशनला बोलावून पोलिसांनी त्यांना समज दिलीय. गुरुवारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर मीनाक्षी साळुंखेच्या सोशल मीडिया अकाउंटवर असेच स्टंट करतानाचे व्हीडिओ आहेत. पोलिस त्याचाही तपास करत असून न्यायालयाच्या परवानगीने या दोघांवर कलम 308 अर्थात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यासाठी पोलीसांचे प्रयत्न सुरू आहेत.


 रिलसाठी जीव धोक्यात  


सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी  रिल्स केली जातात.   मात्र यामुळे पालकांची झोप उडाली आहे.  प्रत्येक दुनियेचं एक पॅशन असतं. सध्याच्या जगाचं पॅशन सोशल मीडिया झालंय. सोशल मीडियाने क्रिएटिव्हिटीला वाव दिला. मात्र याच सोशल मीडियाने रिल्सनाही जन्म दिलाय. अवघ्या मिनिटांत तुमची क्रिएटिव्हिटी दाखवण्याची संधी मिळाली. मात्र उत्तम काही सादर करण्याऐवजी स्टंटबाजी करून स्वतःचे आणि दुसऱ्यांचे  प्राण धोक्यात घालणाऱ्यांची संख्या जास्त झालीय. मिनिटांच्या रिलसाठी जीव धोक्यात  घालणारे हे विसरतात की जरा काही बिघडलं तर ते आपल्या जीवावर बेतू शकते. असे प्रयत्न अनेकांच्या जिव्हारी बेतल्याच्या बातम्याही आपण ऐकल्या आण पाहिल्या असती. तरीही अशा परिस्थितीत व्हिडीओ किंवा रिल्स बनवण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही.  


हे ही वाचा :


Video : संभाजीनगरमध्ये रील्सच्या नादात तरुणीने गमावला जीव, रिव्हर्स घेताना एक चूक अन कार गेली थेट दरीत