पुणे : दबक्या पावलांनी आला अन् हडपसरच्या पोरांना तो कंगाल करून गेला. चोराने तीन मिनिटांची रेकी केली आणि पीजीवर राहणाऱ्या पोरांना गंडा घातल्याची घटना घडली. मोबाईल, लॅपटॉप, 51 हजारांची रोख रक्कम या चोरट्याने अवघ्या 40 सेकंदात लंपास केली. 


जणू काही आपलचं घर असल्यासारखा तो दरवाज्याकडे गेला. एका हातात मोबाईल होता अन् दुसऱ्या हाताने  त्याने दार पुढे केलं. घरात कुणी आहे का याचा अंदाज घेऊ लागला. त्याला कदाचिच कुणाचीच हालचाल दिसली नाही. हळूच  त्याने चप्पल काढली आणि थेट घरात घुसला. अगदी 30-40 सेकंदात चोरटा आपलं मिशन फत्ते करून घराबाहेर पडला. घराबाहेर पडताना हळूच दारही लावून घेतलं. कुणाला काहीच कळलं नाही असं त्या चोरट्याला वाटून गेलं असावं. मात्र इमारतीत लावलेल्या सीसीटीव्हीत ही सगळी घटना कैद झाली. 


बॅग, लॅपटॉप, मोबाईल. हाताला लागेल त्या महागड्या वस्तू घेऊन चोरटा अगदी 40 सेकंदात फरार झाला. ही धक्कादायक घटना घडलीये पुण्यातील हडपसर येथे. 19 जून रोजी साधारण पाऊणे सातच्या सुमारास ही घटना घडली. 


या बिल्डिंगमध्ये काही मुलं पीजीवर राहत होते. घराचा दरवाजा उघडा होता. चोरट्याला आयती संधी चालून आली.  हॉलमध्ये कुणी नसल्याचे पाहून चोरट्यांने मोल्यवान वस्तू पळवल्या. चोरी करण्याआधी चोरट्यानं रेकी केल्याचं देखील उघड झालंय. त्यामुळे आपल्या घर आणि आई-वडिलांपासून लांब राहणाऱ्या मुलांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.


ही बातमी वाचा: