एक्स्प्लोर

Savitribai Phule Pune University: फी वाढ मागे घ्या अन्यथा आंदोलन करु; विद्यार्थी संघटनेचा इशारा

पीएच.डी., पदव्युत्तर अभ्यासक्रमांची फी वाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. वसतिगृहे 11 जुलैपर्यंत फी वाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे.

Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंना पत्र लिहून पीएच.डी., पदव्युत्तर अभ्यासक्रमांची फी वाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. वसतिगृहे 11 जुलैपर्यंत फी वाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने याबाबत पत्र देत असा इशारा दिला आहे.  त्यामुळे विद्यार्थी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.
 

विद्यार्थी दलित पँथर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, युक्रांद, भारतीय विद्यार्थी मोर्चा अशा विविध विद्यार्थी संघटनांसह अन्य संघटनांकडून शुल्कात सूट देण्याची मागणी होत आहे. बहुतेक विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आणि कमी उत्पन्न गटातून येतात. त्यामुळे कोविड महामारीतून अर्थव्यवस्था अजून सावरली नसताना विविध अभ्यासक्रम आणि वसतिगृह सुविधांसाठी शुल्क वाढ करणे समर्थनीय नाही, अशी माहिती युक्रांदचे कमलाकर शेटे यांनी दिली आहे.

Phdच्या फी वाढीचा आढावा घेण्यासाठी पुणे विद्यापीठाने नेमली समिती
विद्यार्थी अभ्यासकांनी पीएचडी फी वाढीच्या निर्णयाला विरोध केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) पीएचडी फी वाढीचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमली आहे. समितीच्या सूचनेनुसार शुल्कात सूट देण्याचा निर्णय घेतला जाईल.

विद्यापीठाने 2019 मध्ये शुल्काची पुनर्रचना केली, ज्यामध्ये प्रवेश शुल्क आणि अभ्यासक्रम शुल्क वाढविण्यात आले. त्यानंतर फी जवळपास दुप्पट झाली. कोरोनानंतर विद्यापीठाने फी वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, विद्यार्थी अभ्यासकांनी या दरवाढीला विरोध करत ही फी वाढ अवाजवी असल्याचे सांगत आपली फी कमी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे फी वाढीचा आढावा घेण्यासाठी विद्यापीठाने समिती नेमण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन फी वाढीचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांना अहवाल देणार आहे. त्यानंतर फीमध्ये सूट मिळू शकते, असं पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितलं.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
Pimpri Chinchwad Fire : 21 गाड्या जळत होत्या, घराचं दार उघडेना, मग गॅलरीतून खाली उडी मारली! 20 वर्षीय आर्या 70 ते 80 जणांसाठी देवदूत ठरली
21 गाड्या जळत होत्या, घराचं दार उघडेना, मग गॅलरीतून खाली उडी मारली! 20 वर्षीय आर्या 70 ते 80 जणांसाठी देवदूत ठरली
Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Pune Graduates Constituency Mahayuti : शिवसेनेने साथ दिली नाही, एका जागेच्या हव्यासापोटी मित्रपक्षांना अडचणीत आणलं, भाजपच्या नवनाथ बन यांनी विधानपरिषदेतील पराभवाचं कारण सांगितलं
शिवसेनेने साथ दिली नाही, एका जागेच्या हव्यासापोटी मित्रपक्षांना अडचणीत आणलं, भाजपच्या नवनाथ बन यांनी विधानपरिषदेतील पराभवाचं कारण सांगितलं

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
Meenakshi Shinde मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
Pune Accident News: वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Virar Crime News: बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
Embed widget