एक्स्प्लोर

Pune Traffic : पुण्यातील विद्यापीठ चौक होणार 'सिग्नल फ्री'; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 'हे' असतील पर्यायी मार्ग

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक सिग्नल फ्री करण्याचा निर्णय वाहतूक पोलीसांनी घेतला आहे.  या चौकात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Traffic  :  पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे (Pune Traffic) विद्यापीठासमोरील चौक सिग्नल फ्री करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.  या चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  पुण्यात मेट्रोचे काम वेगाने सुरू आहेत. विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या खांबांचे काम पूर्ण झाले आहेत. आता येथील उड्डाण पुलाच्या कामाचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी मेट्रोकडून अतिरिक्त बॅरिकेडिंग केले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.

पुण्यातील शिवाजीनगरकडून येणारा गणेश खिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता इथे एकत्र येतात तर दुसऱ्या बाजूने पाषाण रस्ता, बाणेर रस्ता आणि औंध रस्ता या चौकात येऊन मिळतात.  पुढे गणेश खिंड आणि सेनापती बापट रस्त्यावरुन येणाऱ्या वाहनांना पाषाण, बाणेर किंवा औंध अशा कोणत्याही भागात जायचे असेल तर पाषाण रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे. औंधला जाणाऱ्या वाहनांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून वळसा घेऊन औंधला जावे लागणार आहे तर बाणेरला जाणाऱ्या वाहनांना पाषाण रस्त्यावरील अभिमानश्री सोसायटीपासून उजवीकडे वळून बाणेर रस्त्यावर यावे लागणार आहे. सोमवारपासून पुण्यातील वाहतुकीत हे बदल करण्यात येणार आहेत. 

असा असेल वाहतुकीत बदल

-बाणेर आणि औंध रस्त्याने विद्यापीठ चौकात येणारी वाहने विना सिग्नल शिवाजीनगरकडे डाव्या लेनने जाणे प्रस्तावित आहे. विद्यापीठ चौक येथे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वेळ देण्यात येत आहे.

-गणेशखिंड रस्त्याने सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी यापूर्वी कॉसमॉस बँक येथे ‘यू टर्न’ देण्यात आला होता. तो ‘यू-

-टर्न’ बंद करून सेनापती बापट रस्ता जंक्शन येथून उजवीकडे वळण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

- सेनापती बापट रस्त्याने (चतुःश्रृंगी मंदिर) येथून विद्यापीठ चौकाकडे येणारी सर्व वाहतूक सेनापती बापट रस्ता जंक्शन येथून डावीकडे वळून सरळ पाषाण रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे.

औंधकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग-

पर्यायी वर्तुळाकार मार्ग 1: गणेशखिंड व सेनापती बापट रस्त्याकडून पुणे विद्यापीठ, चतुःश्रृंगी पोलिस ठाणे, कस्तुरबा गांधी वसाहतीकडे जाणाऱ्या वाहनांनी पाषाण रस्त्याने सिंहगड गेट (पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय) येथून उजवीकडे वळून बाणेर रस्त्याने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंधकडे जावे.

पर्यायी मार्ग 2 : पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटी, पाषाण रस्ता जंक्शन, उजवीकडे वळून अभिमानश्री सोसायटी, बाणेर रस्ता जंक्शन उजवीकडे वळून बाणेर रस्त्याने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंध कडे जाता येईल.
पर्यायी मार्ग 3 : सेनापती बापट रस्त्याकडून औंधकडे जाणाऱ्या वाहनांनी पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटी, पाषाण रस्ता जंक्शन, उजवीकडे वळून अभिमानश्री सोसायटी. बाणेर रस्ता जंक्शन डावीकडे वळून बाणेर फाटा, उजवीकडे वळून सर्जा हॉटेल कॉर्नर डावीकडे वळून क्रोमा मॉल रस्त्याने किंवा बाणेर फाटा उजवीकडे वळून आय. टी. आय. रस्ताने परिहार चौक मार्गे इच्छितस्थळी जावे.

राजीव गांधी पुलाकडून गणेशखिंड रस्त्याकडे येणाऱ्यांना पर्यायी मार्ग

-ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून स्पायसर कॉलेज रस्ता, आंबेडकर चौक, साई चौक, उजवीकडे वळून खडकी पोस्टे रेल्वे अंडरपास डावीकडे वळून चर्चे चौक, जुना पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करता येईल.

- पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, मुंढव्याकडून औंधकडे जाणाऱ्या वाहनांनी इंजिनीअरिंग कॉलेज उड्डाणपुलावरून, वाकडेवाडी, पोल्ट्री फार्म चौक, चर्च चौक, डावीकडे वळून खडकी पोलिस ठाणे अंडरपास, डावीकडे वळून मरिआई मंदिर, उजवीकडे वळून गोगादेव चौक, उजवीकडे वळून जे टाइप (फुटबॉल ग्राउंड), उजवीकडे वळून साई चौक, डावीकडे वळून आंबेडकर चौक, स्पायसर चौक, ब्रेमेन चौकातून इच्छितस्थळी जावे.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

Embed widget