एक्स्प्लोर

Pune Swargate Assault: स्वारगेटच्या घटनेनंतर वसंत मोरेंचं पुण्यात खळखट्याक आंदोलन, उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले, शाब्बास मोरे!

Pune Swargate Assault : स्वारगेटच्या घटनेनंतर वसंत मोरेंचं पुण्यात खळखट्याक आंदोलन केलं. मोरेंच्या या भुमिकेनंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी वसंत मोरे यांना फोन करुन त्यांच्यावर आणि इतर शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

पुणे: पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर, शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला. ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी काल (बुधवारी) स्वारगेट बस स्थानकात घुसून, सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली. सुरक्षा रक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट बसस्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेत, म्हणजे इथे दररोज बलात्कार (Pune Crime News) होतात, मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे? असे सवाल करत, वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली. या घटनेला जर कुणी कारणीभूत असेल तर ते सुरक्षारक्षक आहेत. या ठिकाणी 20 सुरक्षारक्षक असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे या घटनेमध्ये सुरक्षा रक्षक सामील आहेत असा आरोप वसंत मोरे यांनी केला. तर मोरेंच्या (Vasant More) या भुमिकेनंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी वसंत मोरे यांना फोन करुन त्यांच्यावर आणि इतर शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

स्वारगेट बस जेपो परिसरातील बंद असलेल्या एसटी बसेसमध्ये गैरप्रकार होत असल्याचं वसंत मोरे यांनी काल समोर आणलं होतं. या वास्तवानंतर स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा किती रामभरोसे आहे हे चित्र स्पष्ट झालं. त्यामुळे ठाकरे गटाने तीव्र आंदोलन केले होते. या संदर्भात उद्धव ठाकरेंनी स्वतः फोन करून वसंत मोरे यांनी कौतुक केलं आहे. याबाबतची माहिती वसंत मोरे यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्सवरून दिली आहे. 

काय म्हटलंय वसंत मोरे यांनी?

आपल्या पोस्टमध्ये ठाकरे गटाचे नेते सवंत मोरे लिहतात, "कोण म्हणते "मातोश्रीवर" कामाची दखल घेतली जात नाही... आंदोलनानंतर अगदी काही तासातच पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊतसाहेब दोघांचीही पाठीवर थाप...आंदोलनात सहभागी सर्व शिवसैनिकांचे महिला रणरागिणींचे अभिनंदन केले", अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

उध्दव ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यात काय झाला संवाद?

उद्धव ठाकरे : हॅलो, जय महाराष्ट्र वसंत राव.
वसंत मोरे : जय महाराष्ट्र साहेब.
उद्धव ठाकरे : चांगलं केलंत, जोरात केलंत.
वसंत मोरे : हो साहेब, दोघं-तिघंच जण होतो, पण म्हटलं बाकीचे कोणी येऊन.
उद्धव ठाकरे : काय.. बोलण्याच्या पलिकडे जात चाललंय सगळं.
वसंत मोरे : एवढा घाणेरडा प्रकार होता तिथे एसटीमध्ये  चार शिवशाहीच्या एसटी बसेस बंद पडलेल्या आहेत आणि अक्षरशः त्या एसटीमध्ये लॉजिंग केलंय हो जाणारी लोकं त्या सुरक्षा रक्षकांच्या समोरुन जातात
उद्धव ठाकरे : जे काय लढतोय ना आपण सगळ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. जीव जळतोय हे सगळं पाहून. महाराष्ट्र कुठे चाललाय, मुंबईची हालत, मराठीवर आक्रमण. तरीसुद्धा यांना पोलिसांचीही भीत नाही.
वसंत मोरे : नाही ना. कुणाचीच भीती नाही या लोकांना.
उद्धव ठाकरे : पण चांगलंत केलंत तुम्ही. सगळ्यांना धन्यवाद द्या आणि असेच जागते रहा.
वसंत मोरे : धन्यवाद साहेब, तुमचा फोन आला खूप खूप बरं वाटलं, जय महाराष्ट्र.

 

संबंधित बातम्या - Swarget Bus Depo Crime: दत्तात्रय गाडे हॅबिच्युअल ऑफेंडर? स्वारगेट डेपोत पोलिसी रुबाबात तरुणींवर टाकायचा जाळं, त्या महत्त्वाच्या गोष्टीचाही तपास होणार?

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित 'देवाभाऊ' या पुस्तकाचे प्रकाशन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित 'देवाभाऊ' या पुस्तकाचे प्रकाशन
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Embed widget