पुणे- डेटिंग ॲप (Dating App) वापरून अनेकदा गुन्हे घडतात, अनेकदा फसवणूक केली जाते. अनेक अशा घटना समोर आल्या आहेत. मुलींना-मुलांना अनेकदा फसवल्याचे प्रकार देखील अनेकदा समोर आले आहेत. अशातच गे डेटिंग ॲप वापरून अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये अनेक तरुणांचा समावेश आहे. अनेक तरुणांना निर्जन स्थळी भेटायला बोलवून त्यांचं अपहरण करून त्यांचे फोटो काढण्यात येत होते आणि हे फोटो दाखवून त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत होतं. (Crime News)


एकाने हा प्रकारणी पोलिसांना (Police) तक्रार दिली आणि त्यानंतर हे प्रकरण पुढं आलं, या प्रकरणातील रॅकेट पोलिसांनी बाहेर आणलं. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना नागपूर संभाजीनगर आणि नगरमधून अटक केली आहे. त्यांचा पुढील तपास सुरू आहे. मात्र, हे ॲप वापरून ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी पुन्हा पुढे येऊन संबधित घटना सांगावी आणि अनेक अशा रॅकेटला बाहेर आणावं असं आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) केला आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?


'ग्रिंडर' डेटिंग  (Dating App) ॲपच्या माध्यमातून आरोपी तरूणांशी ओळख वाढवायचे, त्यांना भेटायला बोलवायचे त्यानंतर त्यांच्याकडे असलेले मोबाईल, पैसे, मौल्यवान गोष्टी काढून घेत होते. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंर पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे आरोपी वापरत असलेल्या कारची माहिती घेतली. ती कार रेकॉर्डवरील आरोपी सुशांत नागरे वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अहमदनगर येथून आरोपींना पकडले. तसेच ते वापरत असलेली कार देखील जप्त केली. या टोळीने 1, 7 आणि  8 ऑक्टोबरला अशा पद्धतीने काहींना लुटल्याचे पोलिस (Police) तपासात समोर आले आहे. (Crime News)


कशी करायचे लूट


आरोपींनी लूट करण्यासाठी 'श्रींडर' डेटिंग ॲपचा  (Dating App) वापर करत असे. ते अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात येत त्यांच्याशी ओळख वाढवत. त्यांना एखाद्या ठिकाणी घेऊन संबंधित व्यक्तीला भेटण्यासाठी यायचे. त्यानंतर त्याला सोबत घेऊन त्या व्यक्तीसोबत विचित्र फोटो घ्यायचे, त्याची भीती दाखवत त्यांच्याकडील मोबाईल आणि पैसे, मौल्यवान गोष्टी काढून घ्यायचे. एका घटनेत आरोपींनी एकाकडून 80 हजार रुपये जबरदस्तीने घेतल्याचे देखील पोलिस (Police) तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे करत आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.