पुणे: पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोकं वर काढतानाच चित्र दिसून येत आहे.काही दिवसापुर्वी बोपदेव घाटातील बलात्काराची घटना ताजी असताना आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाणेर परिसरातील टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या तरूणाला आणि त्याच्या मैत्रिणीला बेदम मारहाण करून लुटल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत. या घटनेने पुन्हा एकदा पुण्यात खळबळ उडाली आहे.अबिनियू चवांग आणि त्यांची मैत्रीण चिंगमलाई पामेई अशी मारहाण करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रविवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अबिनियू चवांग (वय-36) यांनी चतुः शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


रविवारी सायंकाळच्या सुमारास अबिनियू चवांग आणि त्यांची मैत्रीण चिंगमलाई पामेई हे बाणेर येथील टेकडीवर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी 18 ते 20 वयोगटातील चार जणांच्या टोळक्यांने त्या दोघांना अडवलं. त्यांना शस्त्राचा धाक दाखवत मारहाण बेदम केली. त्याचबरोबर त्यांनी चिंगमलाईच्या करंगळीवर शस्त्राने वार केला. त्यात तिच्या कारंगळीला गंभीर जखम झाली आहे. मारहाण केल्यानंतर त्यांच्याकडील मोबाईल, इअर बड, तसंच अन्य साहित्य चोरी करून ते चौघे पसार झाले.घटना घडल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत अबिनियू आणि त्यांची मैत्रीण यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर रविवारी रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी एकही आरोपीला अटक केली नाही. या परिसरात सीसीटीव्ही नसल्याने आरोपीपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना पुन्हा एकदा तपासात अडचणी येत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात बाणेर टेकडीवर फिरण्यासाठी आलेल्या या दोघांना धाक दाखवत त्यांच्याकडे असलेल्या मौल्यवान वस्तू घेतल्या. रविवारी सायंकाळी बाणेर टेकडीवर फिरण्यासाठी गेले असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी 18 ते 20 वयोगटातील चार जण त्यांच्याजवळ आले, धारदार शस्त्राचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. यात तरुणीच्या बोटाला जबर दुखापती झाली आहे. मारहाण केल्यानंतर आरोपींनी मोबाईल इयर बोर्ड आणि इतर साहित्य काढून घेत पोबारा केला. त्यानंतर रात्री उशिरा या दोघांनीही चतुशृंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. काही दिवसांपुर्वी बोपदेव घाटामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या दोघांनाही अशाच प्रकारे धाक दाखवत मौल्यवान वस्तू घेऊन तरूणीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती, या घटनेनंतर पोलिसांनी पुणे शहर परिसरातील टेकड्यांवर अशा घटना घडू नये यासाठी उपाययोजना करण्याचे ठरवले होते.