Pune Rain Update: पुण्यात (Heavy Rain) पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. गेल्या वेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून 35-30 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हवलण्यासाठी सूचना देण्यात येत  आहेत. तर सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या एकता नगर भागात सोसायटीत आत्ताच पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. 


प्रशासनाच्यावतीने खबरदारी म्हणून या ठिकाणी भारतीय लष्कर जवानाला तैनात करण्यात आले आहे. पुणे महापालिका तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून या परिसरातील रहिवाशांना सोसायटी मधून खाली येण्याचे आवाहन केलं जातं आहे. एकता नगरमधील सोसायट्यांमध्ये आत्ताच पाणी शिरायला सुरूवात झाली आहे. 


काही रहिवाशांना तिकडून दुसरीकडे सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर काही नागरिक आम्ही घरातच थांबतो असं सांगताना दिसत आहेत. तर खबरदारी म्हणून या परिसरातील रहिवाशांना सोसायटी मधून खाली येण्याचे आवाहन केलं जातं आहे.  भारतीय लष्कर जवान देखील या भागात तैनात करण्यात आले आहेत. या भागात आणखी पाणी भरण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणातून विसर्ग वाढवल्यानंतर नदीपात्र सोडून पाणी बाहेर येण्याची शक्यता आहे. 


पावसाचा जोर वाढला 


पुण्यात आज पावसाचा (Heavy Rain)  पुन्हा एकदा जोर वाढल्याचं दिसून येत आहे. आज हवामान विभागाने पावसाता रेड अलर्ट जारी केला आहे. पुण्यात पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे.  जिल्ह्यांमध्ये घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


खडकवासला धरणातून विसर्ग वाढवणार


खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 29414 क्युसेक्स विसर्ग वाढवून तो सकाळी 11:00 वा. 35002 क्यूसेक्स करण्यात येणार आहे आवश्यकतेनुसार बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.


पिंपरी चिंचवडमधील मोरया गणपती मंदिरात पुन्हा पाणी शिरले


पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर पवना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याच पवनेचे पाणी पिंपरी चिंचवडकर यांचे श्रद्धास्थान असलेला मोरया गोसावी मंदिरामध्ये साचायला सुरुवात झाली आहे, सध्या पवना धरणातून 7070 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्यामुळे, मुख्य संजीवन समाधी मंदिराच्या पायरीला हे पाणी पोचले आहे, दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास विसर्ग अजून वाढवण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिले त्यामुळे हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


पवना आणि मुळा नदी लगतच्या अनेकांचं स्थलांतर 


खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. पवना आणि मुळा नदी लगतच्या अनेक रहिवाशांचे आधीचं स्थलांतर करण्यात आलं आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं अन पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्यानं या जवानांना पाचारण करण्यात आलं आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना


खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरण भरू लागली आहेत. धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातून विसर्ग करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आहे. धरण 65 टक्केपर्यंत पाणी सोडावे असे अजित पवारांनी सांगितले. तसेच पाणी सोडताना नागरिकांना सूचित करावं असे देखील अजित पवारांनी सांगितले आहे. खडकवासला धरण हे 65 टक्केपर्यंत खाली केलं तर रात्री पाऊस पडला तर धरणात पाणी राहील असे अजित पवारांनी सूचना दिल्या आहेत.