Pune Rain Update:  राज्यभरात पावसाचा जोर पुन्हा (Heavy Rain) एकदा वाढल्याचे दिसून येत आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने पुढील 4 दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain) वर्तवला आहे. घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


 गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होत आहे. शनिवारी दिवसभर पावसाची संततधार (Heavy Rain)सुरू होती. पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain)रेड अलर्ट दिला आहे.


या जिल्ह्यांना अलर्ट


रेड अलर्ट : पुणे, सातारा घाट माथा.
ऑरेंज अलर्ट : विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील संवही भागात ऑरेंज अलर्ट आहे.
यलो अलर्ट : कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे जळगाव आणि नंदुरबार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, वीइ प्रभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यली अलर्ट दिला आहे.


लोणावळा शहरात जोरदार पाऊस


लोणावळा शहरात पावसाचा जोर (Heavy Rain) पुन्हा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. काल (शुक्रवारी ता. 2) 24 तासांत 139 मिमी पावसाची नोंद झालीआहे. शुक्रवारी दिवसभर मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. शहरात यावर्षी 3815 मिमी पावसाटी नोंद झाली आहे. शनिवारीही सकाळपासून शहर व परिसरामध्ये जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू होता.लोणावळा परिसरातील धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत असून, भुशी धरणाच्या पायऱ्यांवरूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. 


हवामान विभागाकडून पुणे व सातारा घाटमाथ्यावर दोन दिवस पावसाचा (Heavy Rain) अलर्ट जाहीर केला आहे. जोरदार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. पर्यटन स्थळांवर पर्यटकांची रेलचेल दिसून येत होती.


पवना धरणातून 3200 क्युसेकने विसर्ग सुरू


पवना धरण 92 टक्के भरलेले आहे. धरणाच्या सांडव्यावरून 1800 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे, तर जलविद्युत केंद्रामधून विद्युतग्रहाद्वारे 1400 क्युसेकने पाणी सोडले आहे, असे एकूण 3200 क्युसेकने इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी शनिवारी सायंकाळी 7 वाजता सांडव्यावरून विसर्ग वाढवून 3600 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.


खडकवासला धरणातून 29414 क्युसेकने विसर्ग सुरू करणार


खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 27016 क्युसेक्स विसर्ग सकाळी 9:00 वा. वाढवून तो 29414 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.