Maharashtra politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. बैठका, दौरे, पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. अशातच पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत (Ajit Pawar) गेलेले नेते पुन्हा एकदा शरद पवारांसोबत (Sharad Pawar) येताना दिसत आहेत. त्याचबरोबर इतरही पक्षातील नेते शरद पवारांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करताना दिसत आहेत. 


सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) सदाभाऊ खोत यांना आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिला आहे. रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी काल (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केला आहे.


पुण्यातील मोदी बागेत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये भानुदास शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. शिंदे यांचा पक्षप्रवेश रयत क्रांतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भानुदास शिंदे गेल्या 25 वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत आहेत, अनेक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्याचबरोबर त्यांनी ऊस दर नियंत्रण मंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. शेतकरी चळवळीतील नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या संघटनेत त्यांनी कामाला सुरुवात केली होती.


शरद जोशी यांना प्रेरणास्थान मानून भानुदास यांनी दौंड तालुक्यासह राज्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अनेकदा आंदोलन केली आहेत. भानुदास शिंदे हे सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते. शरद जोशी तसेच माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे. भानुदास शिंदे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात प्रवेश केल्याने दौंडमध्ये पक्षाची ताकद आणखी वाढली असून भाजप आमदार राहुल कुल यांच्यासाठी देखील हा राजकीय धक्का मानला जात आहे.


याआधी अजित पवारांना मोठा धक्का


शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का दिला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शहर अध्यक्षांसह अनेक पदाधिकारी, माजी मगपसेवक यांनी काही दिवसांपुर्वी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar) माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी देखील राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केला. त्यानंतर  सोनाई उद्योग समुहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रविण माने हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता शरद पवार यांनी सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे.