Pune Rain News : पुण्यात आज (दि.8) जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने वादळी वाऱ्यासह लावलेल्या हजेरीमुळे पुण्यातील 31 ठिकाणी झाड पडली आहेत. आज संध्याकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे पुण्यात 31ठिकाणी झडपडीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, पावसामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरू असून कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती आहे. तसेच झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य असून पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नये. पुण्यातील पावसाच्या स्थितीसंदर्भात आपण महापालिका अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून आवश्यक तेथे आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असं पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले.
पुण्यात कोठे आणि किती पाऊस?
शिवाजीनगर एडब्लूएस : 103mmसदाशिव पेठ : 93mmकोथरुड : 91mmसिंहगड रोड : 74mmपाशाण : 65mmबावधन : 48mmबिबवेवाडी : 56mmखराडी : 31mmएनडीए : 41mmवाघोली : 44mmलोहगाव : 18.6 MM
कोठे कोठे झाडं पडली?
येरवडा, नागपुर चाळकोथरुड बस स्टैंड सिहंगड रोड, दामोदर नगरशिवाजीनगर, सावरकर भवनसहकार नगर, तावरे कॉलनीसेनापती बापट रोड गणेश खिंड रोड, ई स्क्वेअर कोंढवा खुर्द, भैरवनाथ मंदिरमार्केटयार्ड, संदेश नगरकल्याणीनगर, गुरूनानक डेअरी येरवडा, सैनिक नगरनवी पेठसुखसागर नगर, आई माता मंदिरपर्वती दर्शन शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरी विमाननगर रास्ता पेठ, दारुवाला पुलएरंडवणा, महादेव मंदिर पद्मावती, ट्रेझर पार्क खडकी, रेंजहिल चौकभवानी पेठ, रामोशी गेट एरंडवणा, खिलारेवाडी जंगली महाराज रोडवाकडेवाडी, पीएमसी कॉलनी कोथरुड, करिश्मा सोसायटीकोथरुड, मयुर कॉलनीयेरवडा क्षेञिय कार्यालय विमानतळाजवळ लोहगाव, पवार वस्ती धानोरी गोखलेनगर
अतिप्रमाणात पाणी साचलेले परिसर
पाषाण, बी यु भंडारी शोरूम जवळ
सिहंगड रोड दोन ठिकाणी
सेंट्रल मॉल समोर
नारायण पेठ, अष्ठभुजा मंदिर जवळ
खडकी, गुरुव्दाराजवळ
एरंडवणा, गणेशनगर
राजेन्द्र नगर
कसबा पेठ, कुभांर वाडा
चंद्रकांत पाटील काय काय म्हणाले?
पुण्यातील पहिलाच पाऊस ढगफुटीसारखा झाला. पुण्यातील अनेक भागात पावसामुळे पाणी साचल आहे. अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. महापालिकेची सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. या ढगफुटी सदृश्य परिस्थितीत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आपण काळजी करू नका. सगळ्या नुकसानाची नुकसानभरपाई केली जाणार आहे. पुण्यात ज्या ठिकाणी नुकसान झाल आहे हे कळेल मात्र नुकसान झाल्याची माहिती द्यायची असेल तर त्यांनी हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा, असं आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या