एक्स्प्लोर

Khadakwasla Dam: पुणेकरांनो सतर्क राहा! पुढील दोन तासात खडकवासलातून कधीही पाणी सोडणार

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातून 35 ते 40 हजार क्युसेकने संध्याकाळी चार ते सहा या दोन तासांच्या कालावधीत कधीही पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.

पुणे: पुणे शहर (Pune Rain) परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) विसर्ग वाढवण्यात आला. याचा परिणाम पुणे शहरातील अनेक भागात बसला आहे. त्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. त्यानंतर आता खडकवासल्यातून (Khadakwasla Dam) विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली होती. तर संध्याकाळी ७ वाजण्याच्या आधी धरणातून विसर्ग करण्यात येईल धरण ५० टक्के रिकामं केलं जाईल, जेणेकरून रात्री पुन्हा पाऊस झाला तर धरण पुन्हा भरेल. त्यामुळे ४ वाजण्याच्या सुमारास विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती होती. खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) ३५ ते ४० हजार क्युसेकने संध्याकाळी चार ते सहा या दोन तासांच्या कालावधीत कधीही सोडण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे

पुणेकरांनी आधी जलसंपदा विभागाकडून विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती दिली नसल्याचा आरोप केला होता. अशातच आता देखील खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) ३५ ते ४० हजार क्युसेकने संध्याकाळी चार ते सहा या दोन तासांच्या कालावधीत कधीही सोडण्यात येईल असा मेसेज जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता गिरीजा फुटाणे यांनी दिला आहे. मात्र यामुळे पाणी नक्की कधी वाढेल याबाबत नागरिकांना नेमकी माहिती मिळत नाहिये. सध्या खडकवासला धरणातून  २० हजार क्युसेकनेच विसर्ग करण्यात येतो आहे. तो सहा वाजेपर्यंत कधीही वाढवला जाऊ शकतो असं गिरीजा फुटाणे यांनी म्हटलं आहे. 

विसर्ग वाढवल्यानंतर पुन्हा एकदा सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या, सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याच्या शक्यता आहेत. तर विसर्ग कधी वाढवणार याबाबत नक्की माहिती मिळत नसल्याने नागरीक संतप्त झाले आहेत. तर अजित पवारांचा (Ajit Pawar) पाहणी दौरा केला असताना त्यांना देखील नागरिकांनी पाण्याचा प्रवाह वाढवल्याची विसर्ग सुरू केल्याची माहिती नव्हती अशी तक्रार दिली. आज सहा वाजता विसर्ग वाढवून ४० हजार क्युसेक करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. 

कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा १५००० क्युसेक विसर्ग वाढवून करून तो संध्याकाळी ६ वाजता ४०००० क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, अशी माहिती देण्यात आली आहे.

पुण्यात मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल 


पुणे महानगर पालिका हद्दीत एकता नगरी सिंहगड रोड वरील द्वारका सोसायटी, शरदा सरोवर सोसायटी, शाम सुंदर सोसायटी, निंबजनगर परिसरातील सोसायटी, सिंहगड रोड, घरकुल सोसायटी पिंपरी चिंचवड, वृंदावन आश्रम आकुर्डी विशालनगर, जगताप डेअरी विणस सोसायटी, कुंदननगर या गृह निर्माण हाउसिंग सोसायटी मध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

कोणते पूल बंद? 

पुणे महानगर पालिका हद्दीत बालेवाडी पूल, मुळा नदी पूल, संगम रोड पूल, होळकर पूल, संगमवाडी पूल, महर्षी शिंदे पूल, हडपसर- मुंढवा रोड पूल, मातंग पूल, येरवडा शांतीनगर येथील पूल, निंबजनगर पूल, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Embed widget