पुणे : पुण्यात (Pune Porshe Accident News)  प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलानं दोन आयटी अभियंत्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं. पण ज्यानं अपघात घडवला त्या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन मिळाला. अनिस अवधिया आणि  अश्विनी कोस्टा ( रा. मध्य प्रदेश) नावाच्या तरुण तरुणीला चिरडले.  आरोपी अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.परंतु हा अपघात इतका भीषण होता  की  अश्विनी कोस्टा सुमारे 10 ते 15 फूट हवेत उडून खाली पडली. डोक्याला मार लागल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला आहे.  या घटनेनंतर मदत करणाऱ्या एक प्रत्यक्षदर्शी  घटनाक्रम सांगितला आहे. 


प्रत्यक्षदर्शी अमन शेख म्हणाला,  मी माझी रिक्षा घेऊन भाड्यासाठी थांबलो होतो. तेव्हा एक पोर्शे कार वेस्टीन जवळून  फुल स्पीडमध्ये आली. तर मृत  दुचाकीस्वार हे यू-टर्न मारुन पुढे चाललले होते. मागून आलेल्य पौर्शे कारने त्यांना मागून येऊन जोरात ठोकले. धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवर मागे बसलेली मुलगी अक्षरश:  हवेत उडाली आणि खाली पडली. तर दुचाकीस्वार मुलाच्या संपूर्ण बरगड्या तुटल्या होत्या. मुलगा फूटपाथवर बसला होता. कारच्या सर्व एअर बॅग उघडल्या होत्या. त्यानंतर आम्ही धावत गेलो. गाडीत तीन मुले होती... एक मुलगा पळून गेला तर दोन मुलांना जमावाने मारले. नंतर पोलीस आले आणि त्यांना गाडीत टाकून घेऊन गेले.  गाडीच्या दोन्ही नंबर प्लेट काढून ठेवलेल्या होत्या. गाडीत असणारी दोन्ही मुले दारु प्यायलेले होते.  गाडीचा स्पीड हा 200 ते 240 च्या आसपास होता. 


नेमकं काय घडले?


ला वेदांत  शनिवारी रात्री मित्रांसोबत graduation party करण्यासाठी गेला होता.  पार्टला जाताना वडिलांची आलीशान पॉर्शे कार  घेऊन तो  गेला.  पार्टी संपवून वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि ड्रायव्हरला शेजारी बसवले. त्याचे दोन मित्र देखील गाडीत मागे बसलेले होते. दारूच्या नशेत वेदांतने गाडीचा स्पीड वाढवला , ट्रम्प टॉवर समोर आल्यानंतर त्याचा  कंट्रोल सुटला आणि  त्याने समोरच्या पल्सरला धडक दिली. त्यांनंतर एका स्वीफ्ट कारला धडक दिली. कोट्यवधी रुपये किमतीच्या  कारनं आणि कारचालकाच्या बेदरकारपणानं दोघांचा जीव घेतला.   पुण्यातल्या ब्रह्मा कॉर्प या नामांकित बिल्डरचा मुलगा आहे.  पुण्यातल्या रस्त्यावर तो मध्यरात्री भरधाव वेगात गाडी चालवत होता.  कल्याणीनगर भागात  भरधाव गाडीनं एका दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. 


आरोपीच्या कारला नंबरप्लेट नव्हती 


अंनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा  असे दोघेही  आयटी अभियंते होते.  हे दोघे आपल्या मित्रांसोबत पार्टी करुन घरी चालले होते. पण वेदांत अग्रवालच्या भरधाव वेगानं त्यांना अक्षरश: चिरडलं . धक्कादायक म्हणजे ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी आरोपीच्या कारला ना पुढे नंबर प्लेट होती ना मागे.. वेदांत अग्रवाल चालवत असलेल्या आणि नंबरप्लेट नसलेल्या या कारची किंमत  तब्बल अडीच कोटी आहे.  अपघातग्रस्त इलेक्ट्रिक पोर्शे स्पोर्ट्स कारची किंमत तब्बल अडीच कोटी आहे . 260 किलोमीटर प्रतितास इतका तिचा वेग आहे. फक्त 2.6 सेकंदात ही कार 100 किलोमीटरचा वेग पकडते .


पुणे पोलिसांनी या प्रकरणात दिरंगाई केल्याचा आरोप


वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. वेदांत अग्रवालवर लावण्यात आलेली कलमं जामिनपात्र असल्यानं त्याला 24  तासांच्या आत जामिनही मिळालाय. वेदांत अग्रवालनं  15 दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत चौकात उभं राहून वाहतुकीचं नियोजन करावं. मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करुन घ्यावेत. भविष्यात अपघात झाल्याचं निदर्शनास आल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी. पुणे पोलिसांनी या प्रकरणात दिरंगाई केल्याचा आरोप होतोय. वेदांत अग्रवाल हा मद्यधुंद अवस्थेत होता का हे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं नाही. त्यामुळं वेदांतला जामीन मिळण्यास मदत झाल्याचा आरोप होतोय.


Video :



हे ही वाचा :


पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण