Maharashtra Wheather Report : राज्यातील पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलय. पुण्यातील दौंड आणि इंदापूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीये. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढलय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालय. कृषी विभागाने नुकसान ग्रस्तांची पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता नुकसानग्रस्त ग्रामस्थ शेतकरी करीत आहेत.
पुण्यातील दौंड तालुक्यात पावसाचे तांडव, झाडं-विद्युत खांब कोसळले
दौंड तालुक्यातील पारगाव (सा.मा.) येथे चक्रीवादळांना आणि मुसळधार पावसाने अक्षरक्षा एक दीड तास तांडव घातले. या चक्रीवादळात जीवित हानी झाली नसली तरी मोठी झाडे, विद्युत खांब व तारा ठिकठिकाणी पडले आहेत. घरावरही झाडे पडल्याने पडझड झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पारगाव परिसरात चक्रीवादळ आले. अचानक आलेल्या या वादळाने काहींच्या घरावरची पत्रे उडून गेली. तर काहींच्या घरावर आणि रस्त्यावर मोठमोठी झाडे पडली. तर काही ठिकाणी विद्युत खांब विद्युत तारा जमीनदोस्त झाल्या. तसेच जनावरांचा चारा असलेल्या कडवळ, मका, उस , व इतर पिके सपाट झाल्याची घटना ठीक ठिकाणी घडल्या. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांच या वादळाने मोठे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची जोरदार बॅटींग
रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात देखील मान्सूनपूर्व पावसानं जोरदार बॅटिंग केली. सह्याद्रीच्या कडेकपारांमध्ये वसलेल्या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करत जोरदार पाऊस बरसला. रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसरासह अकोला तालुक्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यावेळी वाऱ्याचा उपयोग देखील होता. तर ढगांच्या गडगडाटासह यावेळी पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला. पण झालेल्या पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील आंब्याला मात्र याचा फटका बसला.
इंदापूरलाही पावसाचा तडाखा, जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडाले
इंदापूर तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी वादळाचा तडाखा बसला आहे. इंदापूर तालुक्यातील कचरवाडी भागात अवकाळी वादळांने घराचे जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडालेत. मोठी लिंबाची झाडे देखील कोसळली असून विजेचे खांब देखील वाकले झाले असून विड्याच्या पानांच्या शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. उत्तम कचरे यांच्या घरावरील पत्रे उडाले तर वामन कचरे यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील ही पत्रे उडाले आहेत. याच परिसरात शेतातील मोठी झाडे कोसाळली असून विजेचे खांब देखील वाकले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या