पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अनेकांची चौकशी (Pune Porsche car Accident) सुरु आहे. त्यात एक एक नवे खुलासे समोर येत आहेत. त्यात अल्पवयीन मुलाच्या वडिलांची आणि आजोबांची चौकशी करण्यात येत आहे. यात विशाल अग्रवालवर आता दोन गुन्हे नव्यानं दाखल करण्यात येणार आहे. त्यात पुरावा नष्ट केल्याचा आणि खोटी माहिती दिल्याने हे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात विशाल अग्रवालच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही यापूर्वी जुवेनाईल अॅक्टनुसार 75 आणि 77 कायद्याअंतर्गत लहान मुलाच्या हाती गाडी दिल्याचे गुन्हे दाखल केले. मात्र त्यानंतर आता कोर्टाला खोटी माहिती दिल्याचं समोर आल्यानंतर अग्रवालवर पुन्हा नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विशाल अग्रवालवर कलम 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलासोत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला 'तु कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग' असं विशाल अगरवालने ड्रायव्हरला सांगितल्याच पोलीस तपासात निष्पन्न झालंय. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार. तर विशाल अग्रवालवर आर टी ओ च्या तक्रारीनंतर कलम 420 च्या अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसतांना नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्द्ल गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. 


अल्पवयीन मुलाच्या वडिलांची आणि आजोबांची चौकशी करण्यात आली त्यावेळी देखील दोघांच्या जबाबात तफावत आढळली होती. त्यानंतर आज ड्रायव्हर असलेल्या गंगाराम पुजारीने भलतीच कबुली दिली. ज्यामुळे आणखी विशाल अग्रवाल गोत्यात आलेत. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आमच्या पोर्शे कारने दोघांना चिरडले तेव्हा मी नव्हे तर विशाल अग्रवाल यांचा मुलगाच गाडी चालवत होता, असा महत्त्वाचा जबाब ड्रायव्हरने दिला आहे. पोलिसांकडून अग्रवाल यांच्या  चालकाची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याला अपघात (Pune Car Accident) नेमका कसा झाला, याबाबत प्रश्न विचारण्यात आले. अग्रवाल यांच्या चालकाचे नाव गंगाराम पुजारी, असे आहे. अपघात घडला तेव्हा पोर्शे कारचं स्टेअरिंग अल्पवयीन तरुणाच्या हातात होते. मी त्याच्या शेजारी बसलो होतो, अशी माहिती ड्रायव्हर गंगाराम पुजारी याने पोलीस अधिकाऱ्यांना दिली. आपला मुलगा पोर्शे कार चालवत आहे, ही गोष्ट विशाल अग्रवाल यांना माहिती होती, असंगी ड्रायव्हरने सांगितलं. 


हे ही वाचा :


लाडोबाचे लाड करती कोण? बाप कोर्टात म्हणाला,मी चावी देऊन चूक केली, आता आजोबा म्हणतात, मीच पोर्शेची चावी आणि क्रेडिट कार्ड दिलं!