पुणे :  पुण्यातील अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांकडून (Pune Porsche Car Accident)  कारवाईत दिरंगाई आणि कुचराई झाल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांच्या (Pune Police) या कार्यपद्धतीमुळे जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. पुण्यातल्या अपघातानंतर आता विरोधकांनी सरकारला,पोलिसांना घेरलं आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरेंना (Sunil Tingre) सवाल केले जात आहेत. तर कलम 304 लावण्यावरुन धंगेकरांनी गृहमंत्री फडणवीसांवर (Devendra Fadnavis)  दिशाभूल केल्याचा आरोप केला. या सर्व पाश्वभूमीवर आता आमदार नितेश राणे यांनी   राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार  सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांचा कायम राजीनामा मागणाऱ्या  सुप्रिया सुळे गप्प का? असा सवाल नितेश राणेंनी (Nitesh Rane)  केला आहे. ते एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हा सवाल केला आहे. 


नितेश राणे म्हणाले,  नेहमी  बोलणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का आहेत? शरद पवार गटाकडून कोणती प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही? प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सु्प्रिया सुळे गप्प का आहेत?  अग्ररवाल आणि त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध आहेत का?  आरोपीचे वकील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. देवेंद्र फडणीसांनी आयुक्तालयात बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या मुलावर कडक कारवाई सुरू आहे. आता सुप्रियाताईंनी त्या गप्प का आहेत ते आम्हाला सांगावे. त्यानंतर  खूप रहस्य बाहेर येतील. 


कीर्तिकरांनी पक्षाचा राज धर्म पाळला पाहिजे : नितेश राणे


गजानन कीर्तिकरांच्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी आहे.  कीर्तिकरांवर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता आहे. या विषयी नितेश राणे म्हणाले,  शिंदे साहेबांचा आणि शिवसेनेचा हा अंतर्गत विषय आहे. कीर्तिकर साहेबांनी पक्षाचा राज धर्म पाळला पाहिजे. जर पितृ प्रेम असत तर मुलाने गद्दारी केली नसती. 


बळीचा बकरा निवडणूक आयोगाला केले : नितेश राणे


महाराष्ट्रात जाणीवपूर्वक मतदान कमी व्हावं म्हणून प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला, या विषयी बोलताना नितेश राणे म्हणाले,   निवडणूक आयोग आपल्या भारतात लोकशाही टिकवण्याचे काम करत आहे.  हे हिरवे वळवळणारे साप आता आले आहेत.  हरणार हे माहीत आहे. म्हणून बळीचा बकरा निवडणूक आयोगाला केले जात आहे, असे  नितेश राणे म्हणाले. तसेच आशिष शेलार यांची तक्रार रास्त आहे. पराभव समोर दिसू लागल्याने शेमड्यासारखे उद्धव ठाकरे रडत आहेत. निवडणूक लढविण्याची लायकी नसल्याने नाक रडगाण्याचे काम सुरु आहे, अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.  


हे ही वाचा :


विशाल अग्रवालची अडीच कोटीच्या कारसाठी 1700 रुपयांची चिंधीगिरी; आता आरटीओने उचललं मोठं पाऊल