इंदापूर: उजनी धरणात  (Ujani Dam)बोट उलटून बुडाली. यात सहाजण  बेपत्ता होते अखेर शोधमोहितमेनंतर पाच जणांचे मृतदेह हाती लागली लागले आहेत. मागील 36 तास या सगळ्यांचा शोध राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) जवान घेत होते. अखेर त्यांना यश आलं असून पाच मृतहेद हाती लागले आहेत आणि एका मृतदेहाचा अजूनही शोध सुरु आहे. यात जाधव पती पत्नी गोकूळ जाधव आणि कोमल जाधव व त्यांची दोन लहान मुले आणि एकाचा मृतदेह हाती लागला आहे. हे मृतदेह बाहेर काढून पोस्ट मार्टम करण्यासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे. आता एकाचा मृतहेद शोधण्यासाठी पथक कामाला लागलं आहे. त्याचा मृतहेद कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे. 


मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. सगळे एका नातेवाईकाकडे जागरण गोंधळाला जात असताना अचनक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. त्यावेळी बोट पलटी झाली आणि सगळेच पाण्यात उतरले. बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र सुसाट्याच्या वाऱ्यानं पाण्याचा प्रवाह वाढला आणि बोटीत पाणी शिरलं. यावेळी बोटीत सात जण होते. यातील पोलीस असलेल्या डोंगरे यांनी पोहून थेट काढ गाठलं मात्र सहाजण पाण्यात बुडाले.  डोंगरे यांनी गावात जाऊन या घटनेची माहिती दिली आणि ही घटना समोर आली. त्यानंतर NDRF पथकाकडून शोध सुरु झाला. तब्बल 15 तास शोध घेतला मात्र मृतदेह सापडले नाही. मात्र त्यानंतरही शोध सुरुच ठेवला अखेर 17 तासांनी बोट सापडली. ही बोट जलाशयाच्या तळाशी 35 फूट खोल पाण्यात आढळून आली होती. 


त्यानंतर आज सकाळी (23 मे 2024) 36 तासांनी पाच जणांचे मृतदेह सापडले. बरेच तास शोध कार्य सुरु होतं. मात्र तरीही मृतहेद सापडले नाहीत. हे सगळं पाहून नातेवाईकांनी चांगलात संताप व्यक्त केला होता.  महिलेची पर्स, मोबाईल आणि लहान मुलांच्या वस्तू यापलीकडे त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. गोकुळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल दत्तात्रय जाधव (वय 25) शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय 3) (सर्व रा.झरे ता.करमाळा), अनुराग अवघडे (वय 35) गौरव धनंजय डोंगरे (वय 16 दोघे रा.कुगाव ता.करमाळा) अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे आहेत. 


इतर महत्वाची बातमी-


Ujani dam: 36 तास शोध घेऊन कोणीही दिसलं नाही, अखेर सकाळी चार कलेवरं पाण्यावर तरंगताना दिसली, उजनी दुर्घटनेतील 4 मृतदेह सापडले