पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी विशाल अग्रवाल यांच्या ड्रायव्हरने धक्कदायक माहिती जबाबत दिली. मुलाने जर कार मागितली तर त्याचा चालवू दे तू बाजूला बस, अशाप्रकरच्या एकनाअधिक सुचना ड्रायव्हरला विशाल अग्रवालने दिल्या असं ड्रायव्हरने जबाबात सांगितलं. यामुळे विशाल अग्रवाल पुन्हा एकदा चांगलेच गोत्यात आले आहेत. त्यासोबतच गाडीत बिघाड होता. तरीही मुलाला कार चालवायला दिल्याचंदेखील ड्रायव्हरने सांगितलं. या प्रकरणी आता विशाल अग्रवालला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या दिवसांत विशाल अग्रवालची पोलीस सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीतून काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
विशाल अग्रवालयांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? वडिलांनी मुलाला पब मध्ये जाण्याची का संमती दिली?मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अग्रवालहे फरार का झाले? ते जेव्हा संभाजी नगर मध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पुणे पोलीस समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.
या प्रकरणी बारचालक आणि बार टेंडरलादेखील अटक करण्यात आली आहे. या दोघांनी अल्पवयीन मुलाला दारु सर्व्ह केल्याप्रकरणी त्यांना बेड्या ठोकल्या आहे. नितेश शेवानी आणि जयेश गावकर अशी या दोघांची नावं आहे. यांचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे. विशाल अग्रवालसब दोन आरोपींना 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तिघांनाही येरवडा पोलिस ठाण्यातील कोठडी ठेवण्यात आलं आहे. त्यासोबतच अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करुन त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
ब्लड रिपोर्टचं काय झालं?
पुण्यातल्या दुर्घटनेत ब्लड रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. तो पॉझिटिव्ह असेल तरच अग्रवालच्या मुलाविरुद्धचा खटला मजबूत होणार आहे. अगरवालचा दिवट्या आपल्या मित्रांसोबत पार्टी करतोय त्याचं सीसीटीव्ही पोलिसांना मिळालंय. पण पोलिसांनी त्याच्या मित्रांची कोणतीही टेस्ट केलेली नाही किंवा त्यांना साधं चौकशीलाही बोलावलं नाही. त्यामुळे आता पोलिसांच्याच भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
इतर महत्वाची बातमी-