Pune Porsche car Accident Live Update : मोठी बातमी : विशाल अग्रवालला 24 मेपर्यंत पोलीस कोठडी

पुण्यात भरधाव वेगात गाडी चालवून अगरवाल बिल्डरच्या मुलानं दोघांचा जीव घेतला.  कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलीसांनी 185 कलम वाढवलं.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 May 2024 04:16 PM
असिम सरोदेकडून हस्तक्षेप याचिका दाखल

पुणे : सरकारी वकील असिम सरोदे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी दारुबंदी कायदा का लावला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

पुणे अपघात प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी - नाशिक काँग्रेसची मागणी

 नाशिक :  पुणे येथील विमान नगर भागात एका अल्पवयीन मुलांकडून भरदा वेगाने मद्यप्राशन करून गाडी चालवण्यात आली व त्यामध्ये दोन निष्पा तरुण व तरुण यांना आपला प्राण गमवावा लागला. या घटनेनंतर गेल्या 48 तासांमध्ये तपास यंत्रणे करून ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे होता तसे न होता हा तपास करताना संशयास्पद घडामोडी झाल्या. आरोपी मुलास वाचवण्याकरता सत्ताधारी पक्षातील विशेष काही लोकप्रतिनिधी व तपास यंत्रणातले अधिकारी यांच्या संगनमताने आरोपी मुलाला वाचवण्याकरता व त्याला जामीन मिळण्याकरता मुद्दाम परिस्थिती निर्माण करण्यात आली. पुण्यातील पब मध्ये अल्पवयीन मुलाला मध्य प्राशन करून देण्यापासून ते त्या मुलाला जामीन मिळेपर्यंत सर्व यंत्रणा स्वतः करत होती तीच मुळात संशयास्पद होती. तक्रारी मध्ये बदल रक्त तपासणी रिपोर्ट मध्ये बदल अशा विविध घडामोडी संशयास्पद या प्रकरणात करण्यात आला. या अपघातामध्ये दोन होतकरू तरुण व तरुणी यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना ज्या पद्धतीने प्रकरण हाताळण्यात आलं त्याबाबत महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. अशा वेळेस या संपूर्ण प्रकाराची चौकशी एसआयटी मार्फत व्हावी ही मागणी आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मां. निवासी उपजिल्हाधिकारी श्री राजेंद्र वाघ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

Pune Porsche Car Accident विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील विशाल अग्रवाल याला तीन दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाकडून देण्यात आली आहे. 

सखोल चौकशीसाठी सात दिवसांची कोठडी मागितली...

पुणे :सरकारी वकील यांच्याकडून युक्तिवाद सुरू 


ब्लॅक पब चे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिप ने अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश दिला


विशाल अगरवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली?


वडिलांनी मुलाला पब मध्ये जाण्याची का संमती दिली?


मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? 


गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार का झाले?


ते जेव्हा संभाजी नगर मध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत?


वरील सगळ्या गोष्टीसाठी तपास  करण्यासाठी सरकारी वकील यांनी मागितली ७ दिवसांची पोलीस कोठडी

विशाल अग्रवाल यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी द्या; सरकारी वकिल

पुणे : सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. 

विशाल अग्रवालवर मोक्का कारवाई करा; वंदे मातरम् संघटना आक्रमक

पुणे : मुलाने दोन निष्पापांचे जीव घेतले आहेत. विशाल अग्रवाल याच्यावर आधीपासून गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर मोकातंर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.

Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवाल पुणे न्यायालयात हजर

 पुणे :  पुणे हिट अँड रन प्रकरण अपडेट


विशाल अग्रवाल याला पुणे न्यायालयात हजर करण्यात आले आहे


विशाल अग्रवाल यांच्याकडून त्यांचे वकील प्रशांत पाटील युक्तिवाद करणार


वकिलांचा मोठी फौज कोर्टात दाखल

अल्पवयीन आरोपी आणि त्याचे वडील विशाल अग्रवालला कठोर शिक्षा व्हावी: वंदे मातरम् संघटना

पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंंग प्रकरणातील अल्पवयीन आरोपी आणि त्याचे वडील विशाल अग्रवालला कठोर शिक्षा व्हावी, आमचा न्यायालयावर विश्वास आहे. पुण्याची प्रतिमा आम्हाला बदलायची नाही, असं वंदे  मातरम् संघटनेचे अध्यक्ष सचिन जामगे यांनी म्हटलं आहे. 

Pune News : मुलासोबत बापही जबाबदार; वंदे मातरम् संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

पुणे : पुणे: कल्याणीनगर अपघातप्रकरणातील विधीसंघर्ष आरोपीचा वडील विशाल अग्रवालला आज पुणे कोर्टात दाखल करण्यात आलं. वंदेमातरम संघटनेकडून शाई फेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलगा जेवढा जबाबदार आहे तेवढात जबाबदार विशाल अग्रवाल असल्याचं वंदे मातरम् संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. 

विशाल अग्रवालवर कोर्टाबाहेर शाईफेक
विशाल अग्रवालवर शाई फेकल्याने पाच ते आठ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

पुणे : विशाल अग्रवालला घेऊन आलेल्या पोलीस व्हॅनवरती शाई फेकण्यात आली. वंदे मातरम संघटनेने हे पाऊल उचललं. याप्रकरणी वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Pune Porsche Car Accident : मोठी बातमी : विशाल अग्रवालवर शाईफेकीचा प्रयत्न

पुणे : रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवाल यांचावर शाईफेक कऱण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस आयुक्तालयातून कोर्टात जात असताना ही शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वंदे मातरम संघटने कडून विशाल अग्रवाल यांच्यावर शाई फेकण्यात आली...

अल्पवयीन मुलाचा फैसला साडे-चार वाजता

पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बालहक्क कोर्टात हजर करण्यात आलं. या प्रकरणी दोन्ही पक्षाचा य़ुक्तीवाद संपला. साडेचार वाजता कोर्ट निकाल जाहीर करणार आहेत. या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

आयुक्तालयातून विशाल अग्रवाल कोर्टाकडे रवाना

पुणे : रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवाल आयुक्तालयातून कोर्टाकडे रवाना झाले आहेत. 

अल्पवयीन मुलगा जुवेनाईल असल्याची मांडली बाजू

पुणे : पुणे विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाच्या  वकिलांनी अल्पवयीन मुलाची  मांडली न्यायालय समोर बाजू


अल्पवयीन जुवेनाईल असल्याची मांडली बाजू


अग्रवालची वकिलांची बाजू मांडल्यानंतर आता सरकारी वकील मांडणार पोलिसांची बाजू


बचाव पक्षाचा युक्तिवाद संपला


थोड्या वेळात पुणे पोलिसांतर्फे सरकारी वकील युक्तिवाद सुरु होणार.

Pune Porsche Car Accident : तीन दिवसांनंतरही ब्लड सॅपलचा रिपोर्ट आलाच नाही!

पुणे :अल्पवयीन मुलगा दारु पिलेला होता की नाही यासाठी सर्वात भक्कम पुरावा ठरू शकणारा ब्लड सॅपलचा रिपोर्ट मात्र ते अद्यापही आलेला नसल्याने आज देखील तो न्यायालयासमोर  सादर करण्यात आलेला नाही. 

Pune Porsche Car Accident :मुलगा दारु पिला होता; पुणे पोलिस न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न

Pune Porsche Car Accident : पुणे पोलिसांकडून कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जुव्हीनाईल कोर्टात सादर करण्यात आले असून अपघातावेळी हा मुलगा दारु पिला होता हे न्यायालयाला पटवून देण्याचा पुणे पोलिस प्रयत्न करतायत. पुणे पोलिसांनी या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात कलम 185 ची वाढ केलेली असून त्याद्वारे हा मुलगा दारुच्या नशेत होता हे सांगण्याचा पुणे पोलिस न्यायालयासमोर प्रयत्न करतायत.  त्यासाठी पुणे पोलिसांकडून या अल्पवयीन मुलाने कोझी किचन या हॉटेलमधे भरलेले 48 हजार रुपयांचे बील ज्युवीनाईल कोर्टासमोर सादर करण्यात आलेय ज्यामध्ये या मुलाने दारु साठी पैसे मोजल्याचा उल्लेख आहे.  त्याचबरोबर हा मुलगा दारु पित असल्याचे सी सी टी व्ही फुटेज देखील पोलिसांकडून जुव्हीनाईल कोर्टात सादर करण्यात आलेय.  मात्र  हा मुलगा दारु पिलेला होता की नाही यासाठी सर्वात भक्कम पुरावा ठरू शकणारा ब्लड सॅपलचा रिपोर्ट मात्र ते अद्यापही आलेला नसल्याने आज देखील तो न्यायालयासमोर  सादर करण्यात आलेला नाही.

अल्पवयीन मुलगा तो मोठा गुन्हेगार होऊ शकतो; संजय शिरसाटांचा हल्लाबोल

Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवाल यांचे प्रकरण समोर येत आहे.  तो मुलगा अल्पवयीन आहे असे म्हणता येणार नाही. दारू पितो, रॅगिंग करतो, लोकांना चिरडत असल्याने त्याची वागणूक भयंकर आहे. तो मोठा गुन्हेगार होऊ शकतो, असा संताप शब्दात संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. 

पोलीस आयुक्त यांचे निलंबन मागणी म्हणजे हे राजकीय मागणी; संजय शिरसाट

Pune Porsche Car Accident :  चार पाच दिवसांपासून चर्चेत असलेल्या पुणे हिट अँड रन प्रकरणावरून अनेकांनी संताप व्यक्त केले. यावरून पोलीस आणि सरकारवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. पण सरकारने कठोर प्रयत्न केले आहेत. मुलाच्या वडीलाच्या भूमिकेने चीड निर्माण होते. सरकारने पाऊल उचलले आहे. न्यायालयाने जो काही निकाल दिला आहे, असा प्रकार इतिहासत घडला नाही. दारू पिऊन गाडी चालवतो. न्यायालयाने दिलेला निकाल सर्वसामान्य जनतेला पटलेला नाही. नागरिकांचा संताप पाहून आता न्यायालयाने कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणाशी संबंधित लोकांवर कारवाई केली पाहिजे. पोलीस आयुक्त यांचे निलंबन मागणी म्हणजे हे राजकीय मागणी झाली, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. 

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी राहुल गांधी राजकरण करणे चुकीचं; देवेंद्र फडणवीस

Pune Porsche Car Accident : पुणे पोलिसांनी कोर्टात  याचिका दाखल केली. प्रत्येक वेळेस मताचं राजकारण राहुल गांधी करू पाहत आहे. पुणे केस यात राहुल गांधी राजकरण करणे चुकीचं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.


 



Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवाल यांच्याकडे पोलीस विचारपूस करणार

पुणे : पुण्यातील फरसखाना  या ठिकाणाहून विशाल अग्रवाल यांना पुण्यातील पोलीस आयुक्तालयात नेलं जात आहे. पोलीस आयुक्तालयात नेल्यानंतर त्या ठिकाणी विशाल अग्रवाल यांच्याकडे पोलीस विचारपूस करू शकतात. पुणे पोलीस आयुक्तालयातून दुपारी दोनच्या सुमारास त्यांना पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात नेलं जाणार आहे.

सुरेंद्र कुमार अग्रवालने छोटा राजनला माझी सुपारी दिली होती-अजय भोसले

पुणे : पुण्याच्या कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणी अटक असलेल्या विशाल अगरवालच्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिलीय.  विशाल अगरवालचे वडील सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी 2009 साली शिवसेना नेते अजय भोसले यांच्या हत्येचा सुपारी छोटा राजन टोळीला दिली .  अजय भोसले 2009 साली वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांतून निवडणूकीला उभे असताना प्रचारादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.  या अपघातातुन अजय भोसले बचावले. मात्र त्यानंतर गुन्हा दाखल असुनही सुरेंद्रकुमार अगरवाल यांना अटक झाली नाही.

Ajay Bhosale on Vishal Agrawal :सुरेंद्र कुमार अग्रवालने छोटा राजनला माझी सुपारी दिली होती-अजय भोसले

Pune Porsche Car Accident : पुणे शहरातील दोन पब बंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश

 


पुणे : पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलांना दारू पुरविल्याप्रकरणी पुणे शहरातील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) व पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल व परमिट रूम तसेच पबचे आस्थापना विषयक व्यवहार जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ प्रभावासह बंद केले आहेत.


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने पुणे शहरातील सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परवानाधारक हॉटेल, पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये. पहाटे १.३०  नंतर कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये. नोकरनामधारक महिला वेटर्समार्फत रात्री ९.३०  नंतर कोणतीही विदेशी दारू सर्व्ह करु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


बॉम्बे प्रोहिबिशन कायदा १९४९ आणि बॉम्बे फॉरेन लिकर नियम १९५३ अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. संबंधित हॉटेल, पब आणि आस्थापनेला मद्य विक्रीबाबत देण्यात आलेले परवाने निलंबित अथवा रद्द करण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे.

ब्लड रिपोर्ट नाही, पुणे पोलीस ह़़ॉटेलमधील बिलं कोर्टात सादर करणार

पुणे : वेदांत अग्रवालचा ब्लड सँपलचा रिपोर्ट आला नाही आहे. त्यामुळे पुणे पोलीस ह़़ॉटेलमधील बिलं कोर्टात सादर करणार आहेत. वेदांतवर 185 कलम वाढवण्यात आलं आहे. 

रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी अल्पवयीन मुलाला कुटुंबासोबत बालहक्क न्यायालयात हजर

पुणे : पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी अल्पवयीन असलेल्या अल्पवयीन मुलाला  कोर्टात हजर करण्यात आलं आहे. नव्यान गुन्हा दाखल झाल्यावर त्याला बालहक्क न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. 

CM Shinde On Pune Car Accident : पुणे अपघात प्रकरणी कोणालाही पाठिंशी घातलं जाणार नाही

Pune Porsche Car Accident : आरोपी मुलाला दुपारी 12 वाजता न्यायालयासमोर हजर करणार 

पुण्यातील वॅाटर्स आणि ओरिल्ला पबवर महापालिकेची कारवाई

पुणे : हिट ॲंड रन केसांतलं पुणे महापालिका आक्रमक झाली आहे.  कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॅाटर्स आणि ओरिल्ला पब वर महापालिकेची मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील हे दोन्ही पब नामांकित पब आहे शनिवारी आणि रविवारी या पबमध्ये तरुणांची मोठी गर्दी होते. 

पार्श्वभूमी

पुणे :  पुण्यात भरधाव वेगात गाडी (Pune Porsche Car Accident) चालवून अगरवाल बिल्डरच्या मुलानं दोघांचा जीव घेतला.  कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलीसांनी 185 कलम वाढवलं. या मुलाला पुन्हा जुवेनाईल कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. मुलाला  15 तासात जामीन मिळाल्याने संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावरून सरकार आता अॅक्शन मोडवर आलंय.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.