Ajit Pawar on Pune Porsche Car Accident : मी मीडियासमोर जास्त येत नाही, मी माझं काम करत असतो. मात्र, माझ्याबाबतीत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यामध्ये विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने (Ajit Pawar on Pune Porsche Car Accident) कल्याणीनगरमध्ये दोघांना चिरडल्यानंतर अजित पवार काहीच न बोलल्याने तसेच पुण्याचा दौरा न केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे आज पहिल्यांदाच पुण्यामध्ये अजित पवार आल्यानंतर ते पुण्यातील घटनाक्रमावर काय बोलणार? याकडे लक्ष होते. 


वाचा : 'होय, आमदार मध्यरात्री पोलिस स्टेशनला आले होते पण...' पुणे पोलिस आयुक्त सुनील टिंगरेंच्या भुमिकेवर काय म्हणाले?


यावेळी बोलताना अजित पवार यांनी मीडियासमोर फार येत नाही. मात्र, माझं काम सुरूच असल्याची प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांनी बोलताना सांगितले की, राजकीय हस्तक्षेप होऊ न देता प्रकरण गंभीर असल्याचे अजित पवार म्हणाले. संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. त्यांनी सांगितले की मला या प्रकरणांमध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त माहिती देत होते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झाल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की अग्रवाल प्रकरणात जामीन कोणत्या पद्धतीने मिळाला हे पाहिलं आहे, त्यामुळे कडक भूमिका घेतली आहे आणि या प्रकरणांमध्ये पारदर्शक ठेवली आहे. पालकमंत्री म्हणून बारकाईने लक्ष घातलं असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 






अजित पवार यांनी बोलताना पुण्यामध्ये अनधिकृत संस्कृती वाढल्याचे मान्य केले. या संदर्भात कारवाई केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अजित पवार यांनी घाटकोपरमध्ये झालेल्या कारवाईवर सुद्धा भाष्य केलं. त्या ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे मुख्य सचिवांनी पत्र लिहिलं असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांना बी बियाणे, खते मिळण्यासाठी लक्ष असल्याचेही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या