Chetan Vadnere and Gautami Deshpande : पुण्यात झालेल्या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला. एका धनिकपुत्राच्या चुकीमुळे दोन निष्पाप जीवांना त्यांच्या आयुष्याला मुकावं लागलं. या घटनेवर जवळपास संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या लेकामुळे सध्या महाराष्ट्रभरातून रोष व्यक्त केला जातोय. अगदी सामन्यांपासू नते कलाकारांपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर त्यांची स्पष्ट मतं व्यक्त करतोय. पुन्हा एकदा मराठी कलाकारांकडूनही या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. अभिनेता चेतन वडनेरे (Chetan Vadnere) आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) हीने देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 


खरंतर या अपघातानंतर पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर रोष जास्त प्रमाणात व्यक्त केला जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच चेतनने देखील त्याच्या सोशल मीडियावर पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर रोष व्यक्त केल्याचा पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे गौतमीने देखील तिच्या पोस्टमधून जॉली एलएलबी सिनेमाशी तुलना केली आहे. 


चेतनची आणि गौतमीची पोस्ट नेमकी काय?


चेतनने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत यावर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, माहित नाही का, पण मला नाही वाटत की याला कठोर शिक्षा होईल. खरंतर झाली पाहिजे. पोलीस आणि न्यायव्यवस्थेबद्दल मला काही बोलायचं नाहीये. नाहीतर ह्याला सोडून मला जेलमध्ये घालतील. दरम्यान गौतमीने देखील तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. 'जॉली एलएलबी चित्रपट खऱ्या आयुष्यात होत आहे का?' असा सवाल गौतमीने तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टवरुन उपस्थित केला आहे.






नेमकं प्रकरण काय?


पुण्यातील एका नामांकित बिल्डरच्या मुलगा बारावी पास झाला म्हणून रात्री मित्रांसोबत graduation party करण्यासाठी गेला होता. पार्टीला जाताना वडिलांची आलिशान पॉर्शे कार घेऊन तो गेला.पार्टी संपवून घरी येताने त्याने गाडीचं स्टेअरिंग आपल्या हातात घेतलं आणि  ड्रायव्हरला शेजारी बसवले. त्याचे दोन मित्र देखील गाडीत मागे बसलेले होते. दारूच्या नशेत त्याने  गाडीचा स्पीड वाढवला , ट्रम्प टॉवर समोर आल्यानंतर त्याचा  कंट्रोल सुटला आणि  त्याने समोरच्या पल्सरला धडक दिली. यामध्ये दोन आयटी तरुणांचा जीव गेला. अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी या तरुणांची नावं आहे. 


ही बातमी वाचा : 


Pune Accident : 'आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून तुरुंगात टाकायचा कायदा आणा', पुण्यातील पोर्शे अपघातावर मराठी अभिनेत्याची पोस्ट