पुणे : पोर्शे अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाचा कारभार (Pune Porsche car accident) समोर येत आहे. या रुग्णालयात चालत असलेला धक्कादायक प्रकारदेखील समोर आला आहे. हा चुकीचा प्रकार करणार दुसरं तिसरं कोणी नसून डॉक्टरांनीच ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचं समोर आलं. त्यानंतर डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware) आणि श्रीहरी हळनोर यांना ब्लड रिपोर्ट (Blood Report) बदलल्यामुळे पुणे पोलिसांनी थेट अटक केली आहे. मात्र हा प्रकरा अजय तावरे यांनी पहिल्यांदाच केला नाही तर यापूर्वीही तावरेंनी असे प्रकार केल्याचं आता समोर आलं आहे. शिरुरमधील शेख कुटुंबियांसोबतदेखील 2018 मध्ये तावरेंनी ब्लड रिपोर्ट बदलल्याचा प्रकार केल्याचं शिरूरच्या मुलानी आणि शेख कुटुंबीयांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. 


पोर्षे अपघात प्रकरणात अटकेत असणारे वरिष्ठ अधिकारी डॉ अजय तावरेंच्या अडचणी वाढणार आहेत. डॉ. तावरेंनी 2018मध्ये ही असाच एक चुकीचा रिपोर्ट दिल्याचा आरोप शिरूरच्या मुलानी आणि शेख कुटुंबीयांनी केला आहे. रेहाना शेख यांचा 11 ऑगस्ट 2018ला प्रसूती नंतर मृत्यू झाला. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाला, मात्र संबंधित डॉक्टरने रक्त उपलब्ध करून ठेवलं नव्हतं. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने हा मृत्यू झाल्याचा आरोप रेहाना यांचे भाऊ आणि पती ने केला होता. त्यावेळी डॉक्टर अजय तावरेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली गेली, मात्र तावरेंनी 27 नोव्हेंबर 2018ला डॉक्टरांच्या बाजूनं अहवाल दिला. मग या कुटुंबाने ब्लड बँकेतून 21 जानेवारी 2019 रीतसर माहिती घेतली, तेंव्हा डॉक्टर तावरेंनी पैश्यांसाठी चुकीचा अहवाल दिल्याचं या दोन्ही कुटुंबियांच्या लक्षात आलं. तावरेंच्या या हव्यासापोटी मुलानी आणि शेख कुटुंबियांना अद्याप न्याय मिळाला नाही. त्यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे.


दोन्ही डॉक्टरांचं निलंबन करा; पोलिसांचा वैद्यकीय शिक्षण विभागाला अहवाल


पुणे अपघात प्रकरणी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याप्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांचे निलंबन करण्यासाठीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाला पोलिसांमार्फत पाठविण्यात आला आहे.  निलंबन होण्यासाठी आवश्यक असलेली पोलीस कारवाई त्यांच्यावर झालेली आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधित विभागाला याबाबत बुधवारी अहवाल पाठवला आहे.  या अहवालावर संबंधित विभागाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे.


आणखी वाचा


पुणे अपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट, ससूनमधला 'तो' कर्मचारी गायब, पोलीस CCTV फुटेज तपासणार


धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?